Home क्राईम नगर अर्बन बँकेच्या जप्त असलेल्या गळ्यात सुरू होता जुगार अड्डा.. जुगार अड्ड्याला...

नगर अर्बन बँकेच्या जप्त असलेल्या गळ्यात सुरू होता जुगार अड्डा.. जुगार अड्ड्याला अभय कोणाचे?

अहमदनगर दिनांक 30 सप्टेंबर

अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या लोढा हाईट्स मधील तिसऱ्या मजल्यावर नगर अर्बन बँकेच्या जप्त असलेल्या गाळ्या मध्ये जुगार अड्डा सुरू होता. हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कळताच काही कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन सर्व स्टिंग ऑपरेशन केले आणि ही घटना पोलिसांना कळवली कोतवाली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत या ठिकाणी छापा टाकला. या ठिकाणी कोणत्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने हा जुगार अड्डा सुरू याची खमंग चर्चा सुरू होती.

जुगार खेळणाऱ्या लोकांना पोलिसांची भीती वाटत नाही का हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की आम्हाला त्या राजकीय नेत्यांनी परवानगी काढून दिली आहे. त्यामुळे मला भीती नव्हती मात्र आमची चूक झाली असेही कबुली जुगार खेळणाऱ्या लोकांनी यावेळी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version