Home शहर उद्यानात कचरा आढळल्यास ठेका रद्द करण्याचा महानगरपालिका आयुक्तांचा इशारा स्वच्छता ही...

उद्यानात कचरा आढळल्यास ठेका रद्द करण्याचा महानगरपालिका आयुक्तांचा इशारा स्वच्छता ही सेवा अभियानात महालक्ष्मी उद्यान परिसरात विद्यार्थ्यांची साफसफाई

अहमदनगर – स्वच्छता ही सेवा अभियानात मंगळवारी सकाळी शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून महालक्ष्मी उद्यान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात उद्यांस्तून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा संकलित करण्यात आला. हे उद्यान खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात आले आहे. उद्यानात स्वच्छता नसेल तर ठेका तत्काळ रद्द केला जाईल, अशी तंबी आयुक्त यशवंत डांगे यांनी ठेकेदार संस्थेला दिली.

अभियानात केशवराव गाडिलकर व म्हात्रे विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी महानगरपालिका कर्मचाऱ्यांसमवेत परिश्रम व मेहनत घेऊन उद्यानातील कचरा साफ केला. आयुक्तांनीही त्यांच्या या कामाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सवय अंगी बाळगल्यास भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. स्वच्छतेबाबत स्वतः पासून सुरुवात केल्यास स्वतःची व आपल्या शहराचीही प्रगती होईल, असे मत आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, महालक्ष्मी उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आढळून आल्याने आयुक्त यशवंत डांगे यांनी उद्यानाच्या ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. विद्यार्थ्यांनी व आयुक्तांनी स्वतः हा कचरा उचलून साफ केला. उद्यान बीओटी तत्त्वावर चालवण्यास दिले आहे. यापुढे उद्यानात साफसफाई व्यवस्थित न ठेवल्यास ठेका तत्काळ रद्द करण्यात येईल, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी दिला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version