Homeजिल्हाचार जून च्या आधीच सुट्टे बाजारात उमेदवारांच्या विजयाबाबत सट्टे बाजारात भाव जोरात......

चार जून च्या आधीच सुट्टे बाजारात उमेदवारांच्या विजयाबाबत सट्टे बाजारात भाव जोरात… देशात कोण येणार राज्यात कोण येणार …आणि अहमदनगर दक्षिण मध्ये सट्टा बाजारात फेवरेट कोण…

advertisement

अहमदनगर दि.३० मे
सध्या देशातील लोकसभेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या असून अनेक ठिकाणी या निवडणुकांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी विविध समीकरणे अस्तिवात आल्यामुळे कोणता उमेदवार निवडून येईल हे सांगणे कठीण झाले आहे. मात्र प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आपला उमेदवार कसा निवडून येईल याबाबत चांगलेच तर्क वितर्क लावून मतांची समीकरणे आणि गणिते सांगत आहेत.

यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारसोपाराचा नारा दिला असून इंडिया आघाडीही आपण बहुमतात येणार असल्याचे दावे करत आहेत. या दावे प्रति दाव्यामुळे निवडणूकी मध्ये चुरस निर्माण झाली असून त्याचबरोबर सट्टा बाजाराही चांगलाच तेजीत झाला आहे. आयपीएल मध्ये लावतात त्याचप्रमाणे या निवडणुकीतही सट्टेबाजी जोरात सुरू असून निवडणुकीमध्ये ही सेशन लावले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या चरसो पारच्या नाऱ्यामुळे सट्टेबाजारात भाजपला 299 ते 304 असे सेशनमध्ये भाव दिला गेला आहे.

तर राज्यात बहुतांश ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरस निर्माण झाल्यामुळे राज्यात महायुतीच्या तीस जागा सट्टेबजांच्या बाजारात दाखवत आहेत तर माहविकास आघाडीला १८ जागा सट्टे बाजारात दाखवण्यात येत आहेत. यामध्ये शरद पवार गटाला मागील वेळेपेक्षा दोन जागा जास्त मिळतील अशी शक्यता आहे.

अहमदनगर दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यात सुट्टेबजांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झालेला असून दोन्ही जागांबाबत प्रश्नचिन्ह असल्यामुळे विविध ठिकाणी वेगवेगळे रेट दाखवत असून काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवार फेवरेट आहे तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार फेवरेट आहे. त्यामुळे दक्षिण जिल्ह्यात बाजारही गोंधळात असल्यामुळे निवडून कोण येणार याबाबत आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी दोन्ही उमेदवार एक रुपया ते 50 पैसे पर्यंत रेट होता मात्र दोन दिवसानंतर विखे यांना रेटच मिळत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे तर लंके यांना एक रुपया वीस पैसे रेट असल्याचं चर्चा सुरू आहे. तर काही उमेदवारांच्या समर्थकांनी निकाल लागण्या आधीच भले मोठे फ्लेक्स तयार करून ठेवले असून निकालाच्या दिवशी आघाडी घेतल्या नंतर हे फ्लेक्स लावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यावर्षीची निवडणूक हे खऱ्या अर्थाने चांगलीच चुरस निर्माण करणारी झाली असून चार तारखेची आता सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत.

अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात सुद्धा विखे आणि लंके यांच्या मताधिक्यावरही सट्टेबाजी सुरू असून निवडून येण्याच्या लीडवर सट्टेबाजी सुरू आहे. दीड लाखाच्या वर मताधिक्य घेऊन उमेदवार निवडून आला तर त्याला वेगळा रेट असून एक लाखाच्या आत मध्ये वेगळा रेट आहे त्यामुळे सध्या सट्टेबाजींच्या बाजारात चांगलीच मोठी उलाढाल होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular