Homeक्राईमचार धनादेशच्या अनादर प्रकरणी आरोपीस चारही प्रकरणांमध्ये कैद व भरपाई देण्याचे कोर्टाच्या...

चार धनादेशच्या अनादर प्रकरणी आरोपीस चारही प्रकरणांमध्ये कैद व भरपाई देण्याचे कोर्टाच्या आदेश..

advertisement

अहमदनगर दि.२९ मे

अहमदनगर येथील अतिरिक्त चीफ जुडीशियल मॅजिस्ट्रेट कोर्ट नं 11 श्रीमती हेमलता जाधव यांनी नुकतीच धनादेश न वटल्याप्रकरणी आरोपी बाबासाहेब रावसाहेब उगले राहणार तिसगाव पाथर्डी अहमदनगर यांना फिर्यादी भूषण बापूसाहेब शिंदे राहणार सावेडी अहमदनगर यांची फसवणूक केले प्रकरणी चार महिन्याची कैद व रुपय २,३२,००० नुकसान भरपाई तसेच नुकसान भरपाई न दिल्यास एक महिना अशी शिक्षा सुनावली आहे.

फिर्यादी भूषण शिंदे यांनी आरोपी बाबासाहेब उगले यांच्याशी घरगुती संबंध असल्याकारणाने हात उसने म्हणून रक्कम दिली होती परत फेड करण्यास आरोपी यांनी फिर्यादी यांना धनादेश दिला परंतु तो बँकेमध्ये न वटल्याकारणाने फिर्यादी यांनी आरोपी विरुद्ध कोर्टात दाद मागितली त्यानुसार न्यायालयाने आरोपीस शिक्षा दिली.

फिर्यादी यांच्यावतीने अँड विक्रम वाडेकर, अँड अतिश निंबाळकर, अँड धैर्यशील (अजित) वाडेकर यांनी काम पाहिले.

तसेच सदर व्यवहारा संदर्भात आरोपी यांनी एकूण चार जनादेश दिले होते. चारही धनादेश बँकेत वटल्या न गेल्याने आरोपीस चार ही प्रकरणात एकाच वेळी शिक्षा झाली हे विशेष. अँड वाडेकर, अँड निंबाळकर यांनी सदर प्रकरणात अत्यंत अभ्यासपूर्ण युक्तिवाद करून तसेच साक्ष पुरावा नोंदवून व उच्च न्यायालयातील निकालांचा संदर्भ देऊन फिर्यादीस चारही धनादेश अनादर प्रकरणी न्याय मिळवून दिला.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular