Home शहर शहर आणि उपनगरात गणपती उत्सवाची धूम शहरात 15 तर उपनगरात दहा गणपती...

शहर आणि उपनगरात गणपती उत्सवाची धूम शहरात 15 तर उपनगरात दहा गणपती ।मिरवणुका पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

अहमदनगर दि.३१ ऑगस्ट
दोन वर्षानंतर गणेशोत्सवाचा (ganesh festival) आनंद पाहायला मिळत असून शहरात (city) गणपती आगमनाची धावपळ गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे कोविड मुळे गेली दोन वर्षे गणेश उत्सवावर निर्बंध टाकण्यात आली होती आणि कोरोनाच्याभीतीमुळे सार्वजनिक गणेश उत्सव हा अत्यंत कमी प्रमाणात साजरा केला गेला होता.

मात्र यावर्षी गणेशोत्सव निर्बंध मुक्त असणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( chifminister eknath shinde) यांनी केल्यानंतर आणि कोरोनाचे सावट थोडफार का होईना दूर झाल्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव हा धुमधडाकात साजरा होत आहे. अहमदनगर शहरातील तोफखान पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुमारे 100 च्या वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगी घेतली आहे. तर कोतवाली पोलीस (Norwalk police) स्टेशनच्या हद्दीत दीडशेच्या आसपास सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांनी परवानगी घेतली आहे. तर आज गणेश आगमनाच्या दिवशी 25 ते 30 मंडळ गणपतीची मिरवणूक काढणार आहेत.

दोन वर्षानंतर आलेल्या या गणपती उत्सवामुळे शहरातील वातावरण बदलून गेल आहे. गेल्या दोन दिवसांपासून घरगुती गणपती घेण्यासाठी आणि सार्वजनिक मंडळाचे गणपती घेण्यासाठी नागरिकांनी विविध गणपती स्टॉलवर गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. या वर्षी गणपतीच्या मूर्तीच्या किमतीही अत्यंत वाढल्या असून तरीही गणपती उत्सव यावर्षी जोरात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ठिकठिकाणी मोठमोठे मंडप उभारून येत्या दहा दिवसाची तयारी केली असून देखावे उभारण्यासाठी काही मंडळांची लगबग सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version