Home क्राईम Kind of burningधक्कादायक जमिनीच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रकार

Kind of burningधक्कादायक जमिनीच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रकार

अहमदनगर दि. 29 ऑगस्ट
नगर औरंगाबाद रोडवरील अमीर मळा येथे जागेच्या वादावरून झालेल्या वादात एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली असून जखमी झालेल्या बशीर पठाण यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून बशीर पठाण यांना आधी मांडीवर तलवारीने मागण्यात आले व त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये बशीर पठाण हे अत्यंत भयंकर पद्धतीने भाजले आहेत.

बशीर पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जमिनीचा वाद सुरू असून या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे याबाबत भिंगार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून जागेच्या वादावरून थेट जिवंत जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कालचा कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी गाव घेतली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version