Home शहर आता गणपती मध्ये गर्दी करण्यासाठीही मिळतात पैसे…. त्या मंडळाची गर्दी म्हणजे पैसे...

आता गणपती मध्ये गर्दी करण्यासाठीही मिळतात पैसे…. त्या मंडळाची गर्दी म्हणजे पैसे देऊन जमवल्याची चर्चा…

अहमदनगर दिनांक 19 सप्टेंबर

अहमदनगर शहरात गणपती विसर्जन शांततेत झाले असले तरी या गणपती विसर्जन मिरवणूक डीजेचा दणदणाट आणि नर्तकी नाचवल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. पारंपारिक गणपती उत्सव आता कुठेतरी लोप पावत चालला असून पारंपारिक वाद्यांची जागा आता डीजे ने घेतली असून गणपती समोर नाचण्यासाठी बाहेर गावावरून मुलींना नाचण्यासाठी बोलवण्यात येत असल्याने गणपती उत्सव हा कुठेतरी वेगळ्याच मार्गावर जात आहे.

एवढेच नव्हे तर कालच्या गणपती विसर्जन मिरवणूक केडगावच्या एका मंडळाची गर्दीची चांगली चर्चा सुरू होती मात्र ही गर्दी सुद्धा विकत आणल्याची चर्चा आता नगर शहरात सुरू आहे.नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांसह काही हॉटेल मधील कामगार या मिरवणुकीत गर्दी करण्यासाठी आणले होते पाचशे रुपये आणि बिर्याणी पार्टी अशा बोलीवर ही गर्दी जमवल्याच्याही खमंग चर्चा सध्या नगर शहरात सुरू आहे.
त्यामुळे आता गणपती समोर गर्दी दाखवण्यासाठी आणि आपले शक्ती प्रदर्शन करण्यासाठी निवडणुकीप्रमाणेच मिरवणुकीतही पैशांचे आमिष देऊन गर्दी जमवण्याचा प्रकार आता सुरू आहे असंच म्हणावे लागेल.

त्याचबरोबर गणपती विसर्जन मिरवणुकीत कव्वाली लावण्यावरूनही आता चांगल्या प्रतिक्रिया उमटत असून याबाबत थेट पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन गणपती विसर्जन मिरवणुकीत कव्वाली लावणाऱ्या मंडळावर कारवाई करावी अशी मागणी ही करण्यात आली आहे त्यामुळे यावर्षीची गणपती विसर्जन मिरवणूक काही ना काही कारणाने चांगलीच गाजली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version