Home शहर स्पंदन प्रतिष्ठानने विसर्जन मिरवणुकीत वाजवली कव्वाली….. मंडळावर कारवाई करावी हिंदुत्ववादी संघटनेचे पोलीस...

स्पंदन प्रतिष्ठानने विसर्जन मिरवणुकीत वाजवली कव्वाली….. मंडळावर कारवाई करावी हिंदुत्ववादी संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर दिनांक 18 सप्टेंबर

अहमदनगर शहरात काल गणपती विसर्जन शांततेत झाले असले तरी या गणपती विसर्जन मिरवणूक डीजेचा दणदणाट आणि एका मंडळाने नर्तकी नाचवल्याने एकच चर्चेचा विषय झाला होता झिंगाट झालेले कार्यकर्ते आणि डीजेच्या तालावर त्यांची पडत असलेली पावले हळूहळू गणपतीला पुढे नेत होती बाराच्या ठोक्याला पोलिसांनी सर्व डीजे बंद केले असले तरी अनेक गणपती दिल्ली जवळ पर्यंत पोहोचले नव्हते त्यामुळे मिरवणूक मोठ्या प्रमाणात रेंगाळली होती.

यावर्षीच्या मिरवणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षांनी या गणपती मिरवणुकीत केडगाव येथील स्पंदन प्रतिष्ठान यांच्या वतीने मिरवणुकीत सहभाग घेण्यात आला होता माजी महापौर संदीप दादा कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली याआधी गणपती विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी हे मंडळ सहभागी होत होते मात्र जवळपास 13 वर्षानंतर आता हे मंडळ यावर्षी सहभागी झाले मात्र सहभागी झाल्यानंतरही हे मंडळ वादात सापडले असून गणपती विसर्जन मिरवणुकीत स्पंदन प्रतिष्ठान या मंडळाने श्री गणेशा समोर मुस्लिम धर्मातील कव्वाली जाणून बुजून राजकीय हेतूने वाजवून पवित्र अशा गणेश विसर्जन मिरवणुकीचा अपमान करून तमाम हिंदू धर्मियांची मने दुखावणारे
कृत्य राजकीय स्वार्थापोटी केलेलं आहे असा आरोप करण्यात आला असून स्पंदन प्रतिष्ठान वे संस्थापक अध्यक्ष व या मिरवणुकीचे आयोजक यांच्यावर
प्रचलित कायद्या नुसार गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी असे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे. हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्ते दिनेश हिरगुडे यांनी हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version