अहमदनगर दि.२० नोव्हेंबर
फकीरांची वस्ती म्हणून अहमदनगर शहराची ओळख आहे. मात्र या फकीराच्या वस्तीमध्ये कोणी काही घेऊन जात नाही सर्व काही येथेच ठेऊन जातो. त्यामुळे या शहरात वास्तव्य करत असताना आपण या शहराचं काहीतरी देणं लागतो आणि ते फेडण्यासाठी छोटं मोठं काहीतरी कार्य प्रत्येकाने करायला हावं.जो शहरावर प्रेम करतो त्याला शहर नक्कीच एक ना एक दिवस त्याच्यासाठी काहीतरी चांगलंच देऊन जातो. शहरावर प्रेम करणं म्हणजे शहाराबद्दल चांगले बोलणे नाही तर शहरातील समस्या, सुरू असलेली चुकीचे काम किंवा शहरासाठी काम करणाऱ्या प्रशासनावर लक्ष ठेवून त्यांना शहरासाठी चांगली काम करण्यास भाग पाडणे ही कामे केली तर शहर आपल्यावर प्रेम करते यालाच शहरावर प्रेम करणं म्हणतात.
शहरावर प्रेम कसं करावं याच उदाहरण अहमदनगर शहरातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचे देता येईल.शहरासाठी काहीतरी करायचं म्हणून नेहमीच ते धनाड्य शक्ती विरुद्ध लढा देत असतात विशेष म्हणजे त्यामध्ये सातत्य ठेवलं तर यश मिळतं हे त्यांच्या लढ्यातून पुन्हा एकदा समोर आले आहे. नगर शहरातील जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही प्रकरणा असेल त्यानंतर अग्निकांड प्रकरण तसेच शहरातील कचरा संकलन करणाऱ्या ठेक्यातील घोटाळा असेल आणि आता नुकत्याच त्यांनी बाहेर काढलेले पाणीपट्टी माफीचे प्रकरण असेल आशा अनेक प्रकरणांचा पाठपुरावा एक नगर शहराचा नागरिक म्हणून गिरीश जाधव सातत्याने करीत आहेत. त्यामुळे प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांसह राजकारणातील मोठं मोठ्या नेत्यांची पळताभूई होत आहे.
गिरीश जाधव हे नगर शहरातील विविध प्रश्नांसाठी नेहमीच प्रशासनाच्या दरबारी जाऊन पाठपुरावा करत असतात मात्र प्रत्येक नगरकरांनी जर गिरीश जाधव होण्याचं ठरवलं तर निश्चितच भविष्यात नगर शहर विकासाच्या दृष्टीने वाटचाल करू शकते. नगर शहरातील प्रश्न आहे तरी काय! रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य अशा या छोट्या प्रश्नांसाठी अनेक वर्षांपासून लढा दिला जातोय. मात्र अनेक वेळा हा लढा फक्त निवडणुकीपुरताच आणि भाषणापुरताच आपल्याला दिसून येतो मात्र लढाईमध्ये सातत्य ठेवले तर कधी ना कधी यश येतेच आणि सत्याचा विजय होतो हे गिरीश जाधव यांनी दाखवून दिलं आहे.
गिरीश जाधव यांनी नुकतेच अहमदनगर महानगरपालिकेतील पाणीपट्टी थकबाकी माफी बाबत मोठा स्फोट केला आहे. अहमदनगर महानगर प्रशासनाने महासभेत ठराव घेऊन खासदार सुजय विखे पाटील आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थांना सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांची पाण्याची थकबाकी माफ केली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे संकटाने संपूर्ण जग हादरून गेले होते. त्या काळात नगर शहराची ही परिस्थिती अत्यंत खराब होती अनेक दिवस लॉकडाऊन असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामुळे अनेक लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. मात्र त्यावेळी अनेक आंदोलने आणि मागणी करूनही प्रशासनाने पाणीपट्टी घरपट्टी मध्ये सूट दिली नाही.मात्र चार नगरसेवकांच्या ठरावावर कोट्यावधींची सूट देऊन नगरकरांना अंधारात ठेवले होते मात्र हे प्रकरण गिरीश जाधव यांनी उजेडात आणून पुन्हा एकदा प्रशासनाचा आणि राजकारण्यांचा कुटील डाव नगरकरांसमोर आणला आहे.यालाच म्हणतात समाजच देणं करण महानगरपालिकेत प्रत्येक नगरकर कर भरतो आणि त्यातुनच ही महानगरपालिका चालते त्यामुळे हा पैसा नागरिकांचा असतो आणि धनदांडगे लोक नगरकरांना अंधारात ठेवून जर असे कृत्य करीत असेल तर ते उजेडात आणणारा हा नागरकरांसाठी देनच देत असतो.
नगर शहर सुधारायचे असेल तर प्रत्येकाने गिरीश जाधव होणे गरजेचे आहे गिरीश जाधव होणे म्हणजे आपल्याच कररूपी पैशातून प्रशासन आपल्याला सेवा देत असते मग ते प्रशासन कोणतीही असो महापालिका असो आरोग्य विभाग असो पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन असो हे सर्व प्रशासन जनतेच्या कररुपी पैशातूनच सुरू असते आपलेच पैसे घेऊन आपल्यावरच खर्च करण्यासाठी यांना बसवलेले असते मात्र नागरिक प्रशासनाच्या चुकीच्या कामाचे विरोधात कधीच बोलत नाही त्यामुळे या प्रशासनाचे भागत असतं. त्यामुळे प्रत्येकाने प्रशासनाच्या चुकीच्या कामांवर बोट ठेवलेच पाहिजे आणि आवाज उठवलाच पाहिजे जे काम सध्या गिरीश जाधव करत आहेत. आपलाच पैसा आपल्याला देताना त्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवणे हे प्रत्येक नगरकरांचं कर्तव्य आहे जसं गिरीश जाधव करतात त्याचप्रमाणे प्रत्येक नगरकरांनी केलं तर नगर सुधारायला कितीसा वेळ लागेल.
बऱ्याच वर्षांपूर्वीची एका वृत्तपत्रात अगदी छोटीशी बातमी आली होती. बातमी अशी होती की एखादं आवडीचं सामाजिक, रचनात्मक काम करणाऱ्यांचं आयुष्यमान वाढतं आणि मनःस्थितीही उत्तम राहते. आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या परिघापलीकडे जाऊन इतरांसाठी निःस्वार्थ बुद्धीने काही कार्य करण्यातला आनंद अवर्णनीय असतो. अशा मंडळींचा उत्साह खूप दिवस टिकतो. ते सहसा उदास, निराश होत नाहीत. एखादं अपयशही त्यांना काही शिकवून जातं आणि तो पराभव न मानता ते आव्हान समजून ही माणसं पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतात. या बातमीचा मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अहमदनगर शहरातील गिरीश जाधव यांना समोर आणता येईल.
‘आंतरराष्ट्रीय समाजसेवक दिवस’ येत्या 5 डिसेंबरला आहे . त्या निमित्ताने अनेक नवतरुणांनी गिरीश जाधव यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे ‘आपण काय करू शकणार?’ असं कुणाला वाटू नये.समाजाचं ऋण फेडताना त्याचं मोजमाप नसतं. क्षणभ आणि कणभर जरी ते करता आलं तरी किती आनंद देतं ते गिरीश जाधव यांच्याकडे बघितल्यावर समजून येतं.
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील समस्यांबाबत अनेक वर्तमानपत्र टीव्ही चॅनल्स आणि सोशल मीडिया यावर चर्चा होते मात्र नगर शहरातील समस्या आहेत तसे आहेत याचं कारण म्हणजे आपण फक्त या समस्यांबाबत शब्दांच्या रूपाने वाट मोकळी करून देतो मात्र प्रशासनाकडे जाऊन याचा पाठपुरावा करत नाही अथवा प्रत्यक्ष काम चालू असताना त्याबाबत चूक होत असेल तर जाब विचारत नाही त्यामुळे प्रशासनाच्या अधिकारांचं माऊली जाते आणि समस्या आहेत तसेच कायमस्वरूपी राहतात मात्र प्रत्येक नगरकरांनी रस्त्यावर उतरून किमान एक दिवस जरी गिरीश जाधव होऊन समस्यांचा पाठपुरावा केला तर शहर सुधारायला वेळ लागणार नाही म्हणतात ना समाजावर छाप पाडणारं अद्वितीय कार्य करून इतिहासात अमर होतात. त्यांची प्रेरणा हीच वर्तमानातील असं काम करू इच्छिणाऱ्यांना आंतरिक बळ देत असते. समाज सेवक होऊन काम करताना नकळत समूहमनाशी जोडलं जाऊन व्यक्तिमत्त्व विकास होतो. तो अनेकांचा होताना प्रत्यक्ष अनुभवला आणि त्याचा व्यक्तिगत जीवनात सकारात्मक लाभही होतो त्यासाठी हा शब्दप्रपंच.