अहमदनगर दि.१९ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या थाटामाटात केंद्रीय रस्ते व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्वच मान्यवर उपस्थित होते हा पूल लोकार्पण झाल्यानंतर सायंकाळी या पुलावर लेझर शो आणि फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली.मात्र लेझर शो चा इफेक्ट दिसलाच नाही मात्र याची कसर फटाक्यांनी भरून काढली आहे. अनेक नगरकर आज उड्डाण पूल पाहण्यासाठी उड्डाणपुलाच्या अवतीभोवती गर्दी करून उभे राहिले होते. सायंकाळी सातच्या सुमारास सक्कर चौक ते अशोक हॉटेलपर्यंत पुलाच्या अवतीभोवती तुफान गर्दी होती.
लेझर शो आणि फटाक्यांच्या आतिषबाजी साठी नागरिकांनी गर्दी केली होती मात्र लेझर शो चा प्रकाश लक्षात येत नसल्यामुळे लेझर शो चा शो फ्लॉप गेला असून फटाक्यांची मोठी आतिषबाजी मात्र पाहायला मिळाली. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अरुणोदय हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावरून या आतिषबाजीचा आनंद घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजीत खोसे त्यांच्या बरोबर उपस्थित होते. आज अहमदनगर शहरात दिवाळी साजरी ,झाली असून उड्डाणपुलाप्रमाणेच अहमदनगर जिल्ह्यच्या विकासाची एक्सप्रेस अशीच धावेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
आतिषबाजी झाल्यानंतर रात्री दहा वाजता उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती मात्र रात्री उशिरा हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्यामुळे अनेक नगरकर उड्डाणपुलाच्या अवतीभोवतीच उभे उभे असून उड्डाणपूल कधी वाहतुकीसाठी खुला होतो याचीच वाट पाहत उभे होते .