Home क्राईम गोलमाल है भाई सब गोलमाल है… अर्बन बँकेतील एकेक गोष्टी आता येऊ...

गोलमाल है भाई सब गोलमाल है… अर्बन बँकेतील एकेक गोष्टी आता येऊ लागल्या बाहेर.. न्यायालयात जामीन घेताना संचालक आणि कर्जदार सांगू लागले सत्य कहानी…

अहमदनगर दिनांक 10 ऑक्टोबर

अहमदनगर शहरातील 119 वर्षांचा इतिहास असणाऱ्या नगर अर्बन बँकेत मोठ्या प्रमाणात कर्ज घोटाळा झाल्यामुळे अखेर बँक बंद पडली. मात्र बँक बंद झाल्यानंतरही बँक बचाव समितीने पाठपुरावा करून अनेक ठेवीदारांच्या ठेवी मिळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करून न्यायालयात लढा देत आणि प्रशासकीय यंत्रणेवर दबाव ठेवत पैसे परत मिळवण्यासाठी लढा सुरू ठेवला आहे. त्यांच्या या लढ्याला यशही मिळत आहे. नुकतेच पाच लाख रुपयांच्या आतील ठेविदारांच्या ठेवी परत मिळण्यास सुरुवात झाली आहे अर्बन बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांच्या लढ्याला आता यश येण्यास सुरुवात झाली आहे.


मात्र हे होत असताना या कर्ज घोटाळ्यातील अनेक संचालक आणि कर्जदार आता न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेताना दिसत आहेत .न्यायालयात गेल्यानंतर संचालक आणि कर्जदार आता मनोरंजक कहाण्या न्यायालयासमोर सांगत असल्यामुळे हा कर्ज घोटाळा कशा प्रकारे झाला याच्या अनेक रंजक कहाण्या आता समोर येऊ लागल्या आहेत.

नगर अर्बन बँकेच्या आर्थिक घोटाळ्याच्या पार्श्वभूमी वर नगर अर्बन बँकेचे कर्जदार नुकतेच अटकपूर्व जामीन घेण्यासाठी उच्च न्यायालयात गेले होते. यावेळी त्यांच्या बाजूने वकिलांनी बाजू मांडताना दावा केला की कर्जदाराच्या नावावर तीन कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे मंजूर केले हे त्याला माहीतच नव्हते तर त्याच्या हातात दहा पैसेही आले नाही असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला तर दुसऱ्या एका कर्जदाराच्या वकिलाने त्याच्या अशिलाच्या खात्यामध्ये 65 लाख रुपये कुणी भरले व ते कोणाला दिले गेले हे त्याला माहीतच नव्हते अशी बाजू मांडली यावरूनच संचालक मंडळाचा कारभार किती नियमाबाह्य होता हे न्यायालयाच्या समोरच कर्जदारांनी मांडले असे अनेक कारनामे आता कर्जदार सांगू लागले असून संचालक मंडळातील अनेक आरोपी झालेले संचालकही वेगवेगळ्या कहाण्या सांगू लागल्यामुळे 119 वर्षाची बँक कशाप्रकारे बुडवली गेली याची संपूर्ण जंत्री आता हळूहळू बाहेर येऊ लागली आहे.

तर बँक बंद होण्या पर्यंत कोणत्याही संचालकाने गैरकारभाराविरुद्ध ब्र शब्द काढला नव्हता मात्र बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी राजेंद्र चोपडा यांनी पाठपुरावा करून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बँकेमध्ये झालेल्या कर्ज घोटाळ्या बाबत गुन्हा दाखल केला होता त्याचा तपास आता सुरू आहे. मात्र या प्रकरणात फिर्यादीना आरोपी करण्याचा प्रयत्न बँकेच्या भ्रष्ट संचालकांकडून होत असल्याचं वेळोवेळी समोर येत आहे मात्र बँक बचाव समितीचे सर्व सभासद आणि बँकेची हितचिंतक राजेंद्र गांधी आणि राजेंद्र चोपडा यांच्या मागे उभे असल्यामुळे भ्रष्ट संचालकांचा डाव फसला गेला आणि आता भ्रष्ट संचालकांचे एक एक कारणामे पुढे येऊ लागले आहेत त्यामुळे.. सब गोलमाल है भाई सब गोलमाल है असंच म्हणता येईल !

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version