अहिल्यानगर दिनांक 16 एप्रिल
नगर शहरातील एका नामांकित ज्वेलर्स शो रूम मधून खरेदी केलेले सोन्याची अंगठी ही चांदी मिश्रित अंगठी आढळून आल्याचा धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी विश्वजीत रमेश कासार या फसवणूक झालेल्या ग्राहकाने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सर्व पुराव्यांसहित तक्रार अर्ज दाखल केला आहे.

या बाबत हकीकत अशी की वाळकी येथील विश्वजीत कासार यांनी 18 जानेवारी 2026 रोजी एक लाख 42 हजार रुपये प्रति तोळ्यांनी अडीच अडीच तोळ्याच्या प्रत्येकी दोन अश्या 5 तोळे वजनाच्या 24 कॅरेट च्या हातातील अंगठ्या केल्या त्याचे बिल 7 लाख 33 हजार 236 रुपये बँक खात्यातून स्टेशन रोड वरील त्या नामांकित ज्वेलरीच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते.
त्यानंतर कासार यांना 12 एप्रिल 2026 रोजी सोन्याचे भाव वाढल्याने कासार यांनी अंगठ्या मोडण्याचे निर्णय घेतल्याने केडगाव येथील एका ज्वेलर्स कडे दिल्या होत्या सांग त्यामुळे त्या बदल्यात पैसे घेऊन कासार घरी आले असता त्यानंतर कासार यांना एक तासाने केडगावच्या त्या ज्वेलर्सचा फोन आला त्यांनी सांगितले की तुम्ही दिलेल्या दोन अंगठ्यापैकी एक अंगठी मध्ये चांदी मिश्रित अंगठी असून तिचे टंच व तिच्यामध्ये चांदी व तांब्याचे मिश्रण असल्याचे सांगितले हे ऐकून कासार यांना चांगलाच धक्का बसला होता. त्यांनी तातडीनेव्यावसायिकांनी जाऊन सर्व सोने घेऊन जेथून अंगठ्या खरेदी केल्या होत्या त्या स्टेशन रोड वरील नामांकित ज्वेलर्स मध्ये धाव घेतली नामांकित ज्वेलर्सच्या मॅनेजरने विश्वजीत कासार यांना सांगितले की कारागिरीच्या नजर चुकीने व सदरील बिस्कीट हे मुंबईवरून आल्याने त्यामध्ये त्रुटी असल्याने अशी बाब झाली आहे तरी तुम्हाला त्या बदल्यात दुसरे सोने देतो मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे विश्वजीत कासार यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन सर्व पुरावे तसेच त्या ठिकाणी झालेले संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलीस अधीक्षकांना सादर केले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून आपण घेतलेले सोने खरच सोने आहे का याबाबत आता शंका उपस्थित होऊ लागली आहे.



