अहमदनगर दि.१ऑक्टोबर
अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे वडील ज्येष्ठ नेते गुलाबराव मारुती काळे यांचे प्रदीर्घ आजाराने उपचारादरम्यान आज पहाटे दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज रविवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ठीक ०१.०० वाजता अमरधाम, नालेगाव या ठिकाणी होणार आहे.
गुलाबराव काळे यांनी सहकार क्षेत्रासह सामाजिक आणि राजकीय कार्यात मोठा सहभाग नोंदवला होता. जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांसोबत काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता मागील काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणामुळे ते राजकारणापासून दूर गेले होते.