अहमदनगर दि. १ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील सराफ बाजारामध्ये चोरट्यांची धाडसी चोरी केली असून वर्मा ज्वेलर्स हे दुकान चोरटानी फोडली असून कोतोली पोलीस आणि तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे मात्र सोन्याचा किती ऐवज चोरी गेला याबाबत सध्या तपास सुरू आहे.
ही धाडसी चोरी पहाटे तीन ते चार च्या सुमारास झाला असल्याचा अंदाज असून सराफ बाजारातील मुख्य रोडवर वर्मा ज्वेलर्स यांचे दुकान असून दुकानाचे मालक संतोष वर्मा हे सराफ संघटनेचे जिल्हाध्यक्ष सह राज्य कार्यकारणीवर ते सराफ संघटनेचे काम पाहत असतात. सराफ बाजार तील पोलीस चौकी नुकतीच सुरू केली असून सराफ बाजारात विविध ठिकाणी नेमलेले असतात तरीही ही धाडसी चोरी झाल्याने पोलिसांसमोर एक मोठी आव्हान चोरट्यांनी उभे केले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेले गणपती विसर्जन आणि त्यामुळे कामाच्या ताणामुळे पोलिसांच्या आरामाचा फायदा घेत चोरट्यांनी ही संधी साधली असावी.