Home शहर गुलमोहर रोड वरील संपूर्ण पारिजात चौकाचे डांबरीकरण करावे –  नगरसेवक रामदास आंधळे...

गुलमोहर रोड वरील संपूर्ण पारिजात चौकाचे डांबरीकरण करावे –  नगरसेवक रामदास आंधळे गुलमोहर रस्त्याच्या खडीकरणा आदी डांबरीकरणाचा स्प्रे वापरला गेला नाही

आहमदनगर दि.९ डिसेंबर
– उपनगरातील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या गुलमोहर रस्त्याचे काम सुरू असून खडीकरणकरण्या आदी डांबरीकरणाचा स्प्रे मारण्याची गरज असते मात्र ठेकेदाराने कुठेही डांबरीकरणाचा स्प्रे मारलेला दिसत नाही तरी मनपा प्रशासनाने गुलमोहर रस्त्याच्या कामाची वेळोवेळी पाहणी करणे गरजेचे आहे डांबरीकरणाचा स्प्रे मारला नसल्यामुळे काही ठिकाणी खडी करण उखडले असून खड्डे पडले आहे.
मनपा प्रशासनाने रस्त्याच्या कामाच्या दर्जेकडे लक्ष देऊन उत्कृष्ट रस्त्याचे काम करून घ्यावे याचबरोबर संपूर्ण पारिजात चौकाचे डांबरीकरण करावे जेणे करून या चौकाला शोभा येईल. जेणेकरून या रस्त्याच्या कामाकडे मनपा प्रशासनाने लक्ष देऊन दर्जेदार काम करून घ्यावे अशी मागणी नगरसेवक रामदास आंधळे यांनी मनपा प्रशासनाकडे केली. समवेत सामाजिक कार्यकर्ते बापू जानवे उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version