Home शहर अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक...

अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुलींच्या क्रिकेट  सामान्यांनी संपन्न. नगरच्या मातीत खेळाडूंना क्रिकेटची प्रेरणा मिळते – आ. संग्राम जगताप

अहमदनगर  दि.९ डिसेंबर
– क्रॉम्प्टन क्रिकेट ट्रॉफीचे जनक कै.बाळासाहेब पवार यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये देशपातळीवर कंपनीचे नावलौकिक निर्माण करून दिला आहे क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे कै. बाळासाहेब पवार यांच्या स्मृतीपित्यार्थ कपिल पवार यांनी पुढाकार घेऊन नगर जिल्ह्यातील खेळाडूंना क्रिकेट स्पर्धेचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे स्पर्धेतूनच खेळाडू घडत असतो पुढे जाण्याकरता एक संधी मिळते या माध्यमातून नगर जिल्ह्यातील रणजीपटू खेळाडू निर्माण झाले आहे. नगरच्या मातीत प्रेरणा मिळते त्यातून पुढची पिढी घडली पाहिजेत कपिल पवार यांनी बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मुलींच्या क्रिकेट सामान्याने केला आहे ही बाब कौतुकास्पद आहे.पुढील काळात नगर शहरामध्ये मुलींसाठी क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांचे आयोजन करून व्यासपीठ निर्माण करून द्यावे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मान्यतेने आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी रणजीपटू अनुपम संकलेचा, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुंतीलाल कोठारी, सचिव प्रा.माणिक विधाते, गणेश गोंडाळ, आयोजक कपिल पवार, डॉ.सतीश फाटके, गौरव पितळे, क्रॉम्प्टन कंपनीचे हेड गौतम सुवर्णपाटकी, अविनाश पाटील, प्रदीप आरोटे, डॉ.राहुल पवार, वसीम हुंडेकरी, संदीप पवार, भरत पवार, अरुण नाणेकर, घनश्याम सानप, संदीप घोडके, ज्ञानेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कपिल पवार म्हणाले की माझे वडील कै. बाळासाहेब पवार यांनी क्रॉम्प्टन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.त्यांचा क्रिकेटचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी १६ व १९ वयोगटातील खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये १६ संघ सामील झाले असून सुमारे ३०० खेळाडू क्रिकेट खेळणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी मुलींचे क्रिकेटचे सामने भरावे अशी सूचना केली आहे. त्यानुसार जर मोठ्या प्रमाणात मुली सहभागी झाल्या तर पुढील वर्षी मुलींसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाईल शालेय वयातच विद्यार्थ्यांना क्रिकेटचे धडे मिळावे यासाठी स्पर्धेचे आयोजन केले जात आहेत असे ते म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version