Homeदेशहमाल माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवले नाही तर राज्यमंत्री मंडळातील एकाही मंत्र्याला राज्यात...

हमाल माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवले नाही तर राज्यमंत्री मंडळातील एकाही मंत्र्याला राज्यात फिरू दिले जाणार नाही-अविनाश घुले

advertisement

अहमदनगर दि.२१मे
हमाल माथाडी कामगारांचे 21 वे अधिवेशनाचे आज पार पडत असताना या अधिवेशनाचे संयोजक आणि अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी सरकारला इशारा दिला असून हमाल माथाडी कामगारांचे प्रश्न सरकारने सोडवले नाही अथवा या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर या राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. कारण हे सरकार कामगारांपरी असंवेदनशील असून कामगार मंत्र्यांना निरोप देऊनही त्यांनी या अधिवेशनाकडे पाठ फिरवली त्यामुळे या सरकारमधील मंत्र्यांना कामगारांप्रती किती अस्था आहे हे लक्षात येते.

आज झालेल्या एकविसाव्या अधिवेशनात हा ठराव घेण्यात आलाय त्यामुळे पुढील काळात हमाल माथाडी कामगार आणि राज्य सरकार यामध्ये तीव्र संघर्ष होऊ शकतो असा इशाराही अविनाश घुले यांनी दिलाय.

अहमदनगर येथे अधिवेशनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टर बाबा आढाव, पोपटराव पवार, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप,
आमदार प्राजक्त तनपुरे, माजी कुलगुरू सर्जेराव
निमसे, माजी आमदार दादा कळमकर, राष्ट्रवादीचे
जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश प्रवक्ते ताराचंद मस्के
आदी यावेळी उपस्थित होते.

माथाडी कामगार कायदा लागू करण्याच्या भूमिकेवर
बाबा आढाव यांनी तीव्र संताप व्यक्त केला. देशामध्ये लोकशाही राहिली नसल्याची टीका करत बाबा आढाव यांनी आर एस एस सी मोहन भागवत यांच्यावरही कडवट टीका केली

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular