Homeशहरहेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला हे एक उदाहरण .. शाळा कॉलेज नव्हे तर...

हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला हे एक उदाहरण .. शाळा कॉलेज नव्हे तर प्रत्येक पोलीस ठाण्याजवळ आणि थेट पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थाना समोरच मावा बनवणाऱ्या टपऱ्या…

advertisement

अहमदनगर दि.१० ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील सिताराम सारडा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला आणि त्यानंतर हा हल्ला का झाला याची माहिती समोर आल्यानंतर नगर शहरातील बेकायदेशीर चालणारे गुटखा तंबाखू सिगरेट या धंद्यांची पोलखोल झाली. या गुटखा आणि मावा विक्रेत्यांची मजल एवढी वाढली आहे की कोणी आपल्याला विरोध केला तर सुपारी देऊन त्या विरोध करणाऱ्याला धडा शिकवण्याचं काम हे मावा गुटखा विकणारे बहाद्दर करत असल्याचं समोर आला आहे.

अहमदनगर शहरातील मावा आणि गुटखा विक्रेत्यांची एक मोठी साखळी असून ही साखळी थेट पर राज्यापर्यंत पोहोचलेली आहे. अहमदनगर मध्ये तयार केलेला मावा पुणे मुंबई आणि अहमदनगर जिल्ह्याच्या आसपास असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकला जातो विशेष म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी नगर मधील सुप्रसिद्ध मावा मिळेल अशा पाट्याही जागोजाग वाचायला मिळतात यावरूनच नगरचा मावा पुण्यात मध्ये किती प्रसिद्ध आहे हे समजून येते.

अहमदनगर शहराच्या गल्लोगल्ली मावा गुटखा विक्रीचे छोट्या टपऱ्या सुरू आहेत एवढेच काय प्रत्येक पोलीस स्टेशनच्या बाहेर एक तरी मावा गुटखा टपरी आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या घरासमोरच मोठ्या प्रमाणात मावा बनवून विक्री केली जाते.

सुपारी,चुना,तंबाखू आणि नशा येण्यासाठी अनेक घातक पदार्थ टाकून याचे मिश्रण करून ते काही काळ घासून हा मावा बनवला जातो. हा गलिच्छ प्रकार तोंडात टाकून अनेक लोक दिवसभर चघळत असतात नव्हे तर रवंथ करतात. कोणत्याही शासकीय कार्यालया मध्ये जा त्या ठिकाणी भिंतीवर लाल पिचकारी दिसून येतात या पिचकारी या मावा खाणाऱ्या बहाद्दरा मुळेच पडतात हे आता सांगायला नको. सरकारी अधिकारी कर्मचारी आणि अनेक पोलीस कर्मचारी मावा सेवन करतात हेही तेवढेच सत्य आहे. तरुण मुलांमध्ये या माव्याची क्रेझ वाढत चालली असून अनेक शालेय विद्यार्थी सुद्धा मावा खाताना आढळून येतात अनेक शाळा कॉलेजच्या अवती भोवती मावा टपऱ्या आढळून येतात.

कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या या मावा टपऱ्या खुलेआम सरार्स सुरू असतानाही याकडे अन्न औषध प्रशासन दुर्लक्ष करते कारण एकच की मनुष्यबळ कमी पोलीस प्रशासनाने यावर छापा टाकला तरी यामध्ये तक्रार देण्यासाठी अन्न औषध प्रशासनाचा अधिकारी लागत असल्यामुळे पोलीस प्रशासनही याकडे डोळे झाक करते मात्र अनेक घातक पदार्थ बनवून खुलेआम या मावटापऱ्या सुरू आहेत.

विविध राजकीय लोकांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या मावा टपऱ्या मधून कमी श्रमात जास्त पैसा मिळत असल्याने या मावा विक्रेत्यांमध्ये दादागिरी करण्याची हिम्मत वाढत चालली असून आपले कुणी काही वाकडे करू शकत नाही अशी भावना या माव-विक्री चालकांमध्ये होत असल्यामुळेच हेरंब कुलकर्णी यांच्यासारख्या मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्यावर हल्ला करण्याचे धाडस या मावा विक्रेत्यांनी केला आहे.

दारूबंदीसाठी अहोरात्र झटणारे बालविवाह रोखणारे म्हणून हेरंब कुलकर्णी यांची ओळख आहे शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. आज पर्यंतच्या कारकिर्दीत त्यांच्यावर असा प्राण घातक हल्ला कुठेही झाला नाही मात्र अहमदनगर शहरात आल्यानंतर थेट मावा चालकाने सुपारी देऊन त्यांच्यावर हल्ला घडून आणला ही धक्कादायक गोष्ट आहे.

आपलं अहमदनगर शहर नेमकं कोणत्या दिशेला चाललंय हे पाहणे गरजेचे आहे पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप कमी झाला तरच गुन्हेगारांवर जरब बसेल त्यामुळे शहरात राजकारण बाजूला ठेवा मात्र गुन्हेगारी कमी करा असंच म्हणावे लागेल.हेरंब कुलकर्णी हे एक उदाहरण झाले मात्र अनेक गोरगरीब लोकांवर हे मावा विक्रेते अवैद्य धंदे चालक अशीच दादागिरी मारहाण करत असतात काही प्रकरणे उजेडात येतात काही प्रकरण दाबली जातात मात्र याला सर्व बाजूने पाहिलं तर राजकारण हेच घातक आहे. त्यामुळे राजकारण्यांनी आता पुढील दिशा ठरवताना आपल्याला अहमदनगर शहर सुधरावयाचे आहे का बिघडवायचं आहे हे ठरवणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular