Homeक्राईमकोयता घेऊन दहशद.... नगर मध्ये हिंदू सणांच्या वेळेसच अनुचित घटना घडतात का?...

कोयता घेऊन दहशद…. नगर मध्ये हिंदू सणांच्या वेळेसच अनुचित घटना घडतात का? त्या दिवशी पोलिसांनी घेतलेली भुमीका योग्यच.

advertisement

अहमदनगर दि.१७ जानेवारी
काही काळापासून नगरच्या हिंदू सण अथवा काही उत्सवांच्या मिरवणुकीवर दगडफेकीचे प्रकार घडले असून त्यामुळे नगर शहरांमध्ये हिंदूंच्या सणांच्या वेळेसच अनुचित प्रकार का घडतात हा असा सवाल आता सर्वसामान्य हिंदू जनतेला पडू लागला आहे याबाबत आज अहमदनगर शहरातील विविध हिंदू संघटना आणि हिंदुत्ववादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन शहरातील परिस्थिती लक्षात आणून दिली. शहरात सर्व सण उत्सव साजरे होत असतात मात्र फक्त हिंदू सणांच्या वेळेसच दगडफेकीचे किंवा अनुचित घटना घडण्याचे प्रकार घडवले जातात का? आणि या प्रकारांमध्ये नेमकं कोण आहे ! याबाबत सखोल तपास करण्याची विनंती कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे.

 


अहमदनगर शहरातील हिंदू सणांच्या वेळेस झालेल्या प्रकारामुळे अनेकांना आपले सण साजरे करण्यापासून वंचित राहावे लागते हे आत्तापर्यंत बराच वेळा घडले आहे. संक्रांतीच्या दिवशी महिलांचा सण म्हणून हा सण पाहिला जातो आणि या सणाच्या दिवशी हळदीकुंकू हा मुख्य कार्यक्रम असतो महिला दिवसभर या क्षणाची वाट बघत असताना सायंकाळच्या दरम्यान काही समाजकंटकांनी हातात कोयता घेऊन आणि दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे महिला भयभीत झाल्या असून सणाच्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे कोणतीही महिला घराबाहेर पडू शकली नाही. त्यामुळे हळदी कुंकाच्या या सणासाठी तयार झालेल्या महिला भीतीपोटी घरातच बसून राहिल्या. या आधी अनेक वेळा असे प्रकार हिंदू सणांच्या वेळेस घडले असल्याने यामागे नेमकं कोण मास्टर माइंड आहे ते शोधून काढणे पोलिसांनी शोधून काढणे गरजेचे आहे. शहरात शांतता टिकवायची असेल तर कोयते घेऊन फिरणाऱ्यांचे कंबरडे मोडलेच पाहिजेल तरच शहरात शांतता राहू शकते पोलिसांनी कोणत्याही दबावाला अथवा आरोपाला न जुमानता आपली पोलिसगिरी दाखवून समाजकंटकावर कारवाईचा बडगा उभारावा अशी मागणी सर्वसामान्य नगरकर करत आहेत.

दगडफेकीची घटना घडली तेव्हा पोलिसांची भूमिका ही योग्य असून पोलीस प्रशासनाने वेळीच धाव घेतल्यामुळे मोठी घटना होता होता टळली आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाचे सर्वसामान्य नगरकर यांनी स्वागत केले आहे. आणि पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेचे नगरकर स्वागत करत असून पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे. आणि यापुढेही कोणत्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी आपली कारवाई सुरूच ठेवावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली आहे. तोंडाला रुमाल बांधून आणि हातात कोयते घेऊन दगडफेक करणारे समाजकंटक कोण आहेत हे सर्व नगरकरांच्या समोर यायलाच हवं आणि यांचे कंबरडे मोडायलाच पाहिजेल तरच नगर शहर पुढील काळात शांत राहील.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular