अहमदनगर दि.१४ ऑक्टोबर
नवरात्र उत्सव सुरू होत असून नवरात्र उत्सवा दरम्यान मोठ्या प्रमाणात गरबा दांडियाचे कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमात जर गैरहिंदू तरुण दिसून आले तर अशा गैर हिंदू तरुणांवर बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या स्वयंसेवकांची नजर असणार आहे.
ज्या आयोजकांनी गरबा दांडिया चे आयोजन केल्यानंतर त्या ठिकाणी गैरहिंदू आले तर त्या गैर हिंदू तरुणांवर गुन्हे दाखल केले जातील आणि ज्या कार्यक्रमांमध्ये गैरहिंदू तरुण प्रवेश करतील अथवा प्रवेश करताना आढळून आल्यास त्यांचा जय श्रीराम लिहिलेली भगवी शाल घालून भगवा टिळा लावून आणि स्टेजवर नेऊन जय श्रीराम चे नारे देण्यास सांगून त्यांचा व्हिडिओ काढण्यात येईल असा इशारा बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाल भंडारी यांनी दिलाय. यामुळे पुन्हा आता नवरात्र उत्सवात गरबा दांडिया ची शक्यता निर्माण झालीय