अहमदनगर दि.१४ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या एका बगीच्या समोर शुक्रवारी दुपारी दोन तरुणी आणि एक तरुण यांच्यामध्ये चांगलीच तुंबळ हाणामारी झाली सुरुवातीला नेमकं काय चाललंय हे कोणालाच कळत नव्हते. मात्र हळूहळू या मारामारीतून एकमेकांवर आरोप होऊ लागले तेव्हा हा प्रेमाचा त्रिकोण असल्याचं समोर आलं.
एक तरुण दुपारच्या वेळेस एका तरुणीला घेऊन बगीचा मध्ये बसला होता त्याचवेळी एक तरुणी त्या ठिकाणी आली आणि तिने बगीच्यात बसलेल्या तरुण आणि तरुणीला मारहाण करण्यास सुरुवात केली हा तरुण एकाच वेळी दोन मुलींना प्रेमाचे आमिष दाखवून फिरत असल्याचं त्यांच्या बोलण्यावरून समोर आलं. आपला मित्र जेव्हा एका तरुणीला घेऊन बगीचा मध्ये बसला असल्याचे पहिल्या मैत्रिणीला कळल्यानंतर तिचा राग अनावर झाला आणि तिने थेट बगीचा मध्ये येऊन दोघांना रांगेहात पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने थेट पोलीस स्टेशन ही गाठले होते मात्र पोलीस येऊपर्यंत तो तरुण आणि दुसरी तरुणी तिथून फरार झाले होते.
या प्रकरणी तक्रार दाखल झाली नसली तरी या मारामारीमुळे बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती एका तरुणासाठी दोन तरुणी भांडत असल्याचं चित्र नगरकरांनी पाहिलं मात्र आजकालचे तरुण आणि तरुणी कोणत्या दिशेला जाते हेही यावरून दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने आता आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.