अहमदनगर दि.१४ ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील नगर – छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील कोठला स्टँड राज चेंबर परिसरात शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास एक चार चाकी गाडी भरधाव वेगात आली आणि तिने तीन जणांना उडवले गाडी एवढी भरधाव वेगात होती की उडवलेले माणसं अक्षरशा हवेत चेंडू सारखे उडले गेले होते त्यापैकी एक गाडीच्या बोनेटवर पडला तर दुसरा थेट गाडीच्या टपावर पडला होता बोनेट वरील माणूस थोडा अंतरावर गेल्यावर खाली पडला मात्र टपावर पडलेला माणूस राज चेंबर पासून जुन्या आरटीओ ऑफिस मार्गे ते थेट तारकपूर पर्यंत टपावरच होता गाडी एवढी भरदाव वेगात होती की ती गाडी पकडण्यासाठी अनेक तरुण मुले तिच्या मागे पाठलाग करत होते. सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ👇
अखेर गाडी गुलमोहर परिसरात पकडली गेली मात्र तोपर्यंत टपाल माणूस कुठे पडला हे पाठलाग करणाऱ्यांच्या लक्षात आले नाही.