अहमदनगर दि.१३ डिसेंबर
अहमदनगर शहरात बुधवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणार्या हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मूक मोर्चाची तयारी गेल्या पंधरा दिवसांपासून अहमदनगर शहरात सुरू असून या मोर्चासाठी कालीचरण महाराज आणि काजल दीदी हिंदुस्तानी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते दिल्लीगेट पर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मूक मोर्चा शहरातील पंचपीर चावडी आशा टॉकीज चौक कापड बाजार तेलीखुंट चौक चितळ रोड मार्गे दिल्लीगेट येथे विसर्जित करण्यात येणार आहे.
या मोर्चासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून नगर शहरातील सुमारे 41 लोकांना या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस हद्दपार करण्यात आले आहे. त्यामध्ये कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 28 तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ११ आणि भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मधील एक अशा लोकांचा समावेश आहे.
या मोर्चासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक ,दोन पोलीस उपअधीक्षक, अकरा पोलीस निरीक्षक ,43 सहाय्यक पोलीस निरीक्षक पीएसआय ,380 पुरुष महिला पोलीस अंमलदार ,दोन आरसीबी प्लॅटून आणि पाच स्ट्रायकिंग फोर्स तसेच या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे आणि व्हिडिओ शूटिंग कॅमेरे तैनात राहणार असून पोलीस प्रशासनही या मोर्चासाठी सज्ज झाले आहे