अहमदनगर दि.१७ जानेवारी
मकर संक्रांतीच्या दिवशी अहमदनगर शहरातील जे जे गल्ली आणि घास गल्ली भागामध्ये तुफान दगडफेकीचा प्रकार घडला होता या घटनेनंतर तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 18 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी न्यायालयाने सुनावली आहे.
या दरम्यान आता अहमदनगर शहरातील विविध हिंदू संघटनातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन नगर शहरात नव्यानेच उदयास येत असलेल्या कोयता गॅंग वर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मकर संक्रांतीची दगडफेक ही सुनियोजित होती हिंदू मुलांवर आणि महिलांवर कोयता दांडके लोखंडी रॉड घेऊन काही तरुणांनी भ्याड हल्ला करत दादागिरी केली आहे. या सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेज मध्ये असून त्या आधारे सर्व समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवसेना उद्धव गट, शिवसेना शिंदे गट तसेच हिंदुराष्ट्र सेना यासह विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवेदन देता वेळी उपस्थित होते. पोलिसांकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून जे दोष असेल त्यांच्यावर कारवाई होणारच असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी बोलताना दिले.