HomeUncategorizedहिंगणघाट येथील तरुणी जळीत हत्याकांड प्रकरणी महायुती सरकार कडून मदतीचा हात... महाविकास...

हिंगणघाट येथील तरुणी जळीत हत्याकांड प्रकरणी महायुती सरकार कडून मदतीचा हात… महाविकास आघाडीच्या काळात घडला होता प्रकार मात्र मदत करण्याचं महाविकास आघाडी विसरल्याने अखेर महायुती सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिला मदतीचा हात … महविकास आघाडी सरकारची फक्त घोषणाबाजी – चित्राताई वाघ

advertisement

वर्धा दि.२७ सप्टेंबर –
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील तरूणीच जळीत हत्याकांड प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजलं होतं. तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते मात्र या जळीत हत्याकांडानंतर मग तरुणीच्या कुटुंबीयांना मदत आणि घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं होतं मात्र या आश्वासनाचा गेल्या अडीच वर्षात तत्कालीन राज्य सरकारला विसर पडला होता. मंत्र महायुतीच्या सरकारकडून या पीडित मुलीच्या कुटुंबीयांना मदतीचा धनादेश देण्यात आलाय.

३ फेब्रुवारी, २०२० रोजी वर्धा येथे एका नराधमाने महाराष्ट्राच्या लेकीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. ८ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरल्याने निर्भयाचा मृत्यू झाला होता. ही घटना वर्धा निर्भया प्रकरण किंवा हिंगणघाट जळीत प्रकरण म्हणून ओळखले गेले. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणामुळे आक्रोश होता संपूर्ण गाव आरोपीला शिक्षा होत नाही तोवर अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमूख यांच्याकडून सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिडित अंकिता पिसुड्डेच्या परिवाराला आर्थिक मदत व तिच्या लहान भावाला सरकारी नोकरीत सामावून घ्यायचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असं नाही या आश्वासनचा विषय तत्कालीन सरकारला पडला होता

मात्र महायुतीचे सरकार येताच महायुतीच्या सरकारकडून पिडीत कुटुंबियांच दुख सावरण्याचा प्रयत्न केला गेला या पिडीत कुटूंबियांच्या मदतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक पाऊल उचलले गेले आणि २५ सप्टेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी निर्भयाच्या पिडित कुटुंबाला देवगिरी येथे बोलवून घेऊन आर्थिक मदतीचा धनादेश दिला. निर्भयाच्या भावाला सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली.

महाविकास आघाडीच्या काळात घडलेल्या घटनेबाबत जरी तत्कालीन सरकारला विसर पडला असला तरी महायुती सरकार महाराष्ट्रातील जनतेबाबत किती सवेंदनशील आहे याची प्रचिती या घटनेवरून दिसून येत असून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मविआ सरकारने त्यांच्या सोयी आणि सवयीप्रमाणे दिलेला एकही शब्द पाळला नाही. वर्ष पीडित कुटुंबाला कसलीही मदत केली नाही.

निर्भया ही महाराष्ट्राची लेक होती ह्याची जाणीव संवेदनशील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना आहे म्हणून शब्द उध्दव ठाकरे आणि मविआ सरकारने दिलेला असला तरी तो पूर्ण देवेंद्र फडणवीस यांनी केला असून म्हणूनच आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचा आम्हाला अभिमान आहे असे चित्राताई वाघ म्हणाल्या

निर्भया सारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये म्हणून सरकार आणि पोलीस प्रशासन कार्यरत आहे हा देखील विश्वास त्यांनी महाराष्ट्राला दिलाय.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular