HomeUncategorizedभाजपच्या महानगर जिल्हाध्यक्ष ,अहमदनगर विधानसभा प्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अहमदनगर...

भाजपच्या महानगर जिल्हाध्यक्ष ,अहमदनगर विधानसभा प्रमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अहमदनगर पत्रकार संघाच्या वतीने चहा पाण्याचे आमंत्रण…

advertisement

अहमदनगर दि २५ सप्टेंबर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे रविवारी नगर मध्ये आले असताना भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी आपल्या विरोधात बातम्या येऊ नये म्हणून पत्रकारांना चहा पाजा आणि दहावी असा सल्ला दिला. या वक्तव्यानंतर आता पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून राज्यांमध्ये विविध ठिकाणी पत्रकारांनी या वाक्याचा निषेध केला आहे त्याप्रमाणे अहमदनगर पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा आणि जन्म नगर शहराचे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष Bअॅड. अभय आगरकर आणि विधानसभा प्रमुख, नगर शहर अहमदनगर विधानसभा प्रमुख, नगर शहर भैय्या गंधे यांच्यासह शहर भाजपाच्या पदाधिकारी, बुथप्रमुख यांच्यासाठी बुधवारी २६ सप्टेंबर रोजी चहा पान कार्यक्रम आयोजित केला आहे.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये पत्रकारांच्या संबंधी बोलताना केलेले विधान अत्यंत निंदणीय असून त्याचा आम्ही निषेध करतो. चहा अन् ढाबा संस्कृती जोपासणारी आणि त्यावर पत्रकारीता करणारे पत्रकार नगर जिल्ह्यात नाहीत याची आपणास पूर्णपणे माहिती आहे. तरीही आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी नगरमध्ये येऊन पत्रकारांना चहा पाजण्याचे व धाब्यावर जेवू घालण्याबाबत
बुथप्रमुखांच्या बैठकीत सांगितले. भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि बुथप्रमुखांना अध्यक्ष मान. अनंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चहापान ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. बावनकुळे यांच्या आदेशाने तुम्ही आम्हाला चहा पाजण्याऐवजी आम्हीच तुम्हा सर्वांना चहा पाजण्याचा निर्णय घेतला असून सदर चहापान कार्यक्रमासाठी आपण व आपले सर्व पदाधिकारी, बुध प्रमुख यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अहमदनगर पत्रकार संघाच्या वतीने सचिव शिवाजी शिर्के यांनी केलंय.

हा कार्यक्रम ज्या ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा झाली त्याच माऊली व्यापारी संकुलाच्या परिसरातील सचिन टी सेंटर येथे सकाळी साडेदहा वाजता हा चहापाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना अहमदनगर पत्रकार संघाच्या वतीने आवाहन करण्यात आले असून पत्रकारांनी प्रत्येक गावात, तालुक्यात भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तसेच बुथ प्रमुखांना कोणत्याही चहाच्या टपरीवर चहापानासाठी एकत्रितरित्या निमंत्रित करावे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular