अहिल्यानगर दिनांक २५ नोव्हेंबर
नगर शहरातील मार्केट यार्ड जवळ असलेल्या महात्मा फुले चौकाजवळ हीट अँड रन ची घटना घडली असून एका पांढऱ्या रंगाच्या XUV 500 या आलिशान वाहनाने रस्त्याने चालणाऱ्या चार चाकी आणि दुचाकी तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक दिली असून यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने त्या परिसरात असलेल्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वाहनाचे ब्रेक फेल झालाने अथवा कोणत्या कारणाने अपघात झाला याबाबत कोणतीही माहिती हाती आली नाही. कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून भरधाव वेगाने धडक देत जाणाऱ्या वाहनाला काही नागरिकांनी गाडी आडवी लावून थांबवले असल्याची माहिती ही त्या ठिकाणी हजर असलेल्या नागरिकांनी दिली आहे.