अजमेर
राजस्थानमधील अजमेर येथील प्रसिद्ध दर्गा हिंदू मंदिर म्हणून घोषित करणारी याचिका कोर्टाने स्वीकारली आहे. न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणीची तारीख 20 डिसेंबर निश्चित केली आहे. वास्तविक, हिंदू सेनेचे विष्णू गुप्ता यांनी अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्गाला हिंदूंचे श्रद्धास्थान म्हणून घोषित करण्यासाठी अजमेर पश्चिम दिवाणी कोर्टात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर बुधवारी अजमेर पश्चिम दिवाणी
न्यायाधीश वरिष्ठ विभाग मनमोहन चंदेल यांच्या
कोर्टात सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्ता
विष्णू गुप्ता यांच्या याचिकेची दखल घेत न्या.
मनमोहन चंदेल यांनी दर्गा समिती, अल्पसंख्याक
व्यवहार आणि एएसआय यांना समन्स नोटीस
बजावण्याचे निर्देश दिले आणि त्यांना पुढील
तारखेला हजर राहण्यास सांगितले आहे.