अहमदनगर दिनांक ४ फेब्रुवारी
एक महिला आणि पुरुष दहा लाखाच्या गाडीत आले आणि खाऊन पिऊन अठराशे रुपये बिल बुडवून गेले हा प्रकार अहमदनगर शहरातील नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये घडला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास एक महिला आणि एक पुरुष आलिशानाच्या बलोना गाडीमध्ये हॉटेलमध्ये आले त्यांनी दारूची आणि मटण ऑर्डर दिली दारूचे सेवन केल्यानंतर आणि त्यासोबत मटन उखर खाऊन झाल्यानंतर त्या महिला आणि पुरुषाने वेटरला बिल घेऊन ये असे फर्मान सोडले आणि वेटर बिल आणण्यासाठी काउंटर कडे वळाला नाही तोच संधीचा फायदा घेऊन ती महिला आणि तो पुरुष हॉटेलमधून पळ काढत गाडीत बसून पळून गेले.

आलिशान बलोना गाडी आणि पुढे पोलीस अशी पाटी लावलेली या गाडीतून दोन जण दुपारी हॉटेल सनी पॅलेस मध्ये आले होते. वेटरला त्यांनी ब्लेंडर दारूची बाटली आणि मटण उखर ची ऑर्डर दिली दीड क्वार्टर आणि मटणावर ताव मारल्यानंतर वेटरला बिल आणायला सांगून त्या महिला आणि पुरुषाने बिल न देताच पळ काढला वेटर बिल घेऊन टेबल कडे गेला मात्र तिथे कोणीच नव्हते ते पाहून त्यांने हॉटेलच्या बाहेर धाव घेतली आणि त्या महिला व पुरुषाला आवाज दिला मात्र तोपर्यंत ती महिला व तो पुरुष गाडीत बसून पळून गेले ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालीय. या गाडीच्या दर्शनी भागात पोलीस नावाची पाटी लावली होती भर दुपारी दीड क्वार्टर मारून दहा लाखाच्या गाडीत अठराशे रुपये बुडून पळणारी महिला कोण हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
पहा सी सी टिव्ही व्हिडिओ👇