Homeक्राईमनगर दौंड रोडवरील "त्या" हॉटेल बाहेर चांगलाच राडा दोन जण गंभीर जखमी;...

नगर दौंड रोडवरील “त्या” हॉटेल बाहेर चांगलाच राडा दोन जण गंभीर जखमी; साहेब जरा लॉजिंग चेक करा शालेय विद्यार्थी सर्रास लॉजिंगवर

advertisement

अहमदनगर दिनांक 8 फेब्रुवारी

नगर तालुक्यातील नगर दौंड वर असलेल्या बाबुर्डी बेंद येथील एका हॉटेलवर आज दुपारच्या दरम्यान मोठा राडा झाला असून या राड्यामध्ये दोन्ही गटाकडून दगडफेकीचे प्रकार झाले आहेत.तसेच या दगडफेकीमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. एका गटाच्या जखमी इसमावर स्वस्तिक चौकाजवळ असलेला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तर दुसऱ्या गटाच्या जखमी इसमावर स्टेशन रोडवरील कोठी जवळ असणाऱ्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत अद्यापही कोणता गुन्हा दाखल झालेला नाही.

पोलिसांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या दोन्ही गटांकडून तक्रार देण्याबाबत संभ्रम असला तरी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहहायक पोलिस निरीक्षक सानप यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस करून माहिती घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. हा वाद जागेवरून असल्याचं समजतंय

तसेच नगर दौंड रोडवर सध्या अनेक हॉटेलमधील लॉजिंग वर चांगला धुमाकूळ सुरू असून अक्षरशः शालेय विद्यार्थिनी सुद्धा या हॉटेलवर सर्रासपणे येत जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. पोलिसांनी या गंभीर घटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा एखादी मोठी अनर्थ घटना घडू शकते.।

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular