Home Uncategorized सावेडी उपनगरातील सोना नगर चौकातील हुक्का पार्लर कम कॅफे हाऊस वर डी...

सावेडी उपनगरातील सोना नगर चौकातील हुक्का पार्लर कम कॅफे हाऊस वर डी वाय एस पी अमोल भारती यांच्या पथकाचा छापा..

अहमदनगर दिनांक २८ फेब्रुवारी

सावेडी उपनगरातील सोना नगर चौकातील Acjis Cafe house and huka parler वर नगर शहर उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकून हुक्का पार्लर ला लागणारे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू जाधव यांच्या फिर्यादीनुसार हुक्का पार्लरचा मालक ऋषिकेश हिंगे आणि चालक सय्यद अनिस युसूफ या दोघांविरोधात सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४ (अ), २१(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर शहराचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सोनानगर चौकामध्ये अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरू आहे त्यानुसार डी वाय एस पी अमोल भारती यांच्या पथकातील पोसई दत्तात्रय शिंदे, पोहेकॉ सुयोग सुपेकर, पोहेकॉ महेश मगर, पोहेकॉ
संतोष ओव्हाळ, पोना हेमंत खंडागळे व पोकॉ सागर राजेंद्र द्वारके यांनी छापा टाकून ही कारवाई केली.

सोनानगर चौक येथील बिराम हॉटेल शेजारी पत्र्याचे शेडमध्ये ऋषिकेश हिंगे हा Acjis Cafe house and huka parler नावाचा हुक्का बार चालवित होता तर सय्यद अनिस युसूफ हा तरुण त्या ठिकाणी काम करत होता पोलिसांनी जेव्हा या हुक्का पार्लरवर छापा टाकला त्यावेळी त्या ठिकाणी पाच टेबल आणि बसण्या करीता आरामशीर सोफे आढळून आले तसेच काही तरुण हो का ओढतानाही त्या ठिकाणी आढळून आले होते मात्र पोलिसांनी त्यांना समज घेऊन सोडून दिले.
पोलिसांनी या हुक्का पार्लरमधून चिलीम तसेच हुक्का पिण्यासाठी वापरण्यात येणारे काचेचे भांडे हुक्का पाईप तसेच तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत तर या ठिकाणी काम करत असलेला सय्यद अनिस युसूफ याला ताब्यात घेतले आहे तर या हुक्का पार्लरचा मालक ऋषिकेश सतीष हिंगे हा फरार आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version