Home राज्य PIF संबंधित अहमदनगर जिल्ह्यातील दोघांना पोलीस यंत्रणेने घेतले ताब्यात

PIF संबंधित अहमदनगर जिल्ह्यातील दोघांना पोलीस यंत्रणेने घेतले ताब्यात

अहमदनगर दि.२७ सप्टेंबर(सुशील थोरात )

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) मागील आठवड्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजधानी दिल्लीसह 11 राज्यांमध्ये धाडसत्र सुरू आहे. यादरम्यान, तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (PIF) च्या ठिकाणांवर धाडी टाकल्या आणि विविध राज्यातून 106 लोकांना अटक केले आहे. महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात सर्वाधिक अटक झाल्या आहेत.

पीएफआयवर देशात हिंसाचार भडकवणे, दहशतवादी हल्ले करणे, दंगे भडकवणे आणि टेरर फंडिंगसारखे गंभीर आरोप आहेत. पीएफआय संघटनेचे डी कंपनीसोबतही कनेक्शन उघड झाले आहेत.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या इस्लामी संघटनेत कार्यरत असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील दोघांना स्थानिक पोलिसांनी आज भल्या पहाटे ताब्यात घेतले होते माहिती अशी माहिती मिळत आहे.

अहमदनगर(ahmednagar) शहर आणि संगमनेर इथं ही कारवाई स्थानिक पोलिस पहाटे केली. कारवाईत अहमदनगर शहरातून संघटनेशी निगडित असलेला विभागीय अध्यक्ष जुबेर आणि संगमनेरमधून संघटनेवर सदस्य असलेला एका मौलाना यांना ताब्यात घेण्यात आले होते.  या दोघांविरुद्ध १५१(३) नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात अली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version