Home राज्य डिझेलच्या। दराने शंभरी ओलांडल्याने स्वस्तात भेटत असलेल्या बायोडिझेल कडे मालवाहतूकदारांचा कल

डिझेलच्या। दराने शंभरी ओलांडल्याने स्वस्तात भेटत असलेल्या बायोडिझेल कडे मालवाहतूकदारांचा कल

अहमदनगर- दि.२८ एप्रिल
काही भागात हॉटेल व ढाब्यावर पुन्हा अवैध बायोडिझेलची सर्रास विक्री सुरू झाली सुरू आहे. . तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कारवाईनंतर विक्रेते पुन्हा सक्रिय झाले आहेत. ते बिनधास्तपणे व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे त्यांना पाठबळ कोणाचे, असा प्रश्‍न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

इंधन दरवाढीने सामान्य जनता हैराण झाली आहे. डिझेलने सध्या शंभरी पार केली आहे. त्यात मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने महागाई वाढली आहे. दरवाढीमुळे डिझेलऐवजी बायोडिझेलसदृश इंधन विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पेट्रोलपंपावर मिळणारे डिझेल १०४ रुपये प्रतिलिटरच्या जवळपास असताना, बायोडिझेलची २५ ते ३० रुपये स्वस्त दराने विक्री होत आहे.

त्यामुळे डिझेल विक्रीत प्रत्यक्षात घट झाल्याचा अंदाज असून, बायोडिझेलसदृश इंधनाची आयात व विक्री अधिक वाढली आहे. लांब पल्ल्याच्या मालवाहतूक गाड्या येथील हॉटेल्स व ढाब्यावर थांबतात, तेथे सहज मिळणारे कमी दरातील अवैध बायोडिझेल त्यांना फायदेशीर ठरते.

दरम्यान मागील काही महिनीनपूर्वी नगर तालुक्यातील परिसरातील ढाबा आणि हॉटेलमध्ये अवैध बिनबोभाटपणे बायोडिझेलची विक्री होत होती.पोलिसांनी या अवैध बायोडिझेल विक्री करणाऱ्या मोठ्या साखळीवर कारवाई केली होती मात्र आता पुन्हा हे बायोडिझेल विक्रेेते डोके वर काढत असल्याचं दिसून येतेय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version