श्रीरामपुर दि.७ जून
श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन नेते वंशीय जनावरांची अवैध कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर श्रीरामपूर ग्रामीण विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आपल्या पथकामार्फत छापा टाकला असता या ठिकाणी अवैद्य गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचं निदर्शनास आलं याठिकाणी असलेल्या समीर मुराद कुरेशी वय 27 वॉर्ड नंबर 2 बीफ् मार्केट जवळ श्रीरामपूर, मोहसीन इस्माईल कुरेशी उर्फ बुंदी रा बाबरपुरा वाड नंबर 2 याचे ताब्यातून 6,00,000/- कि.चा. बोलेरो पिकप मालवाहू गाडी 26,000/- रु. कि.चे 200 किलो गो वंशीय जनावरांचे मांस जप्त करण्यात आले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून दोन जणांविरोधात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे सुधारित कायदा 2015 चे कलम 5,5 ( क) 9 ( अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली ,उपअधीक्षक संदीप मिटके ,ऐ एस आय आरोळे हेड कॉन्स्टेबल सुरेश औटी, पो.ना.भैरवनथ आढागळे,पो.कॉ. नितीन शिरसाठ, आदींनी केली.