अहमदनगर दि. 4 ऑक्टोबर
अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी भाऊसाहेब आघाव यांनी तीन दिवसापूर्वी मुळा डॅम येथे गार्ड ड्युटी असताना सरकारी सर्व्हिस रायफल मधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्यानंतर त्यांची सुसाईड नोट सध्या चांगलीच चर्चेत असून या सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्वतःवर झालेल्या अन्याय बाबत खुलासा केला होता. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर त्यांचे मित्र आणि पोलीस दलातून नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या लोंढे यांनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. यामध्ये भाऊसाहेब आघाव यांच्यावर कशाप्रकारे अन्याय झाला याचे कथन या ऑडिओ क्लिप मध्ये करण्यात आले होते. त्यामुळे या क्लिपची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. राजुर पोलीस स्टेशन मधील भाऊसाहेब आघाव यांना त्रास देणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,सहह्याक फौजदार प्रकाश निमसे, मपोकॉ राउत सर्व नेमणुक राजुर पोलीस स्टेशन ता अकोले तसेच शिवाजी फुंदे नेम- पोलीस मुख्यालय अहमदनगर यांच्या विरोधात भादवि कलम 306,385,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना केले असल्याचं तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे .
मात्र आता या प्रकरणात काही उच्च अधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक कुसकर आणि विभागीय चौकशी अधिकाऱ्यांना आरोपी करावे अशा मागणीचे निवेदन प्रेम कुमार भाऊसाहेब आघाव यांनी विशेष पोलीस महानगर निरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा सोमवारी दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता अहमदनगर शिर्डी महामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. आणि त्या नंतर कोणत्याही प्रसंगी पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगरच्या समोर आम्ही संपूर्ण कुटुंबीय आम्तदहन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पहा काय आहे निवेदन
अर्जदार :- प्रेमकुमार भाऊसाहेब आघाव, वय – २३ वर्षे, धंदा- शिक्षण, राह. बारागांव, नांदूर ता.
राहूरी, जि. अहमदनगर
संपर्क – ७०३८२११३११
विषय :- माझ्या वडीलाच्या आत्महत्त्या संदर्भात पोलीस स्टेशन, राहूरी दाखल गु.र.नं.
९४४/२०२० कलम ३०६, ३८५, ३४ भादवि गुन्हयात मा. पोलीस अधिक्षक साहेब,
अहमदनगर, मा. एसडीपीओ साहेब, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर आणि
कार्यालयीन अधिक्षक, पोलीस अधिक्षक कार्यालय अहमदनगर यांना सहआरोपी
कडून सदर गुन्हयाचा तपास करुन आम्हाला न्याय मिळवून देण्या बाबत.
महोदय,
उपरोक्त विषयांस अनुसरुन सादर विनंती की, दि. ०१/१०/२०२२ रोजी माझे वडील पोहवा. २५९ भाऊसाहेब दगडू आघाव, नेम. पोलीस मुख्यालय, अहमदनगर यांनी पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्या त्रासाला कंटाळून त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त
केल्याने त्यांनी ऑन ड्युटी मुळाडॅम प्रकल्प येथील गार्ड रुम मध्ये त्यांच्या ताब्यातील सव्हिस एस. एल. आर. रायफल मधून स्वतःवर गोळी मारुन घेवून आत्महत्या केली आहे. त्याबाबत पोलीस स्टेशन, राहूरी दाखल गु.र.नं. ९४४ / २०२० कलम ३०६, ३८५, ३४ भादवि अन्वये, गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा तपास करीत आहे. माझ्या वडीलांच्या आत्महत्तेनंतर काल व आज मी माझ्या वडीलांच्या बॅग मधील कागरपत्र तपासून पाहिले असता माझ्या वडीलांविरुध्द खोटा गुन्हा नोंदविण्यात आला होता. व त्या गुन्हयाचा संदर्भ घेवून माझ्या वडीलास निलंबीत
करुन त्यांच्या विरुध्द विभागीय चौकशी चालविण्यात आली होती. व त्यांची विभागीय चौकशी चालू होती. माझ्या वडीलांच्या विरोधातील विभागीय चौकशी मध्ये माझ्या वडीलावर पोलीस स्टेशन, राजूर गु.र.नं. ८५ / २०२१ कलम ३५४, ३५४ (अ), ५०६ भादवि चा खोटा गुन्हा
नोंदविला होता. व त्या गुन्हयातील दोषरोप जशाला तसे घेवुन त्याच दोषारोपासह फौजदारी गुन्हयातील दोषारोप जशाला तसे घेवून विभागीय चौकशी चालविता येत नसतांना मा. पोलीस महासंचालक साहेब, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे परिपत्रक क्र. पोमसं. १९१/२२/६/१६/२०१७
मुंबई दि. २४/०२/२०१७ आणि परिपत्रक क्र. पोमसं./११/२२/विचौ/ लाप्रअ / १३६/२०१४ मुंबई दि. ०९/०५/२०१४ अन्वये, माझ्या वडील केलेल्या कृताकृत कसुरी ( Commission And Omission ) बाबत विभागीय चौकशी संदर्भात मा. सक्षम शिस्तभंग विषयक प्राधिकारी तथा पोलीस अधिक्षक साहेब, अहमदनगर यांनी त्यांच्या स्तरावर आणि गुणवत्तेवर आधारीत योग्यतो निर्णय घेवून माझ्या वडीलांच्या विरुध्द विभागीय चौकशी चालविणे हे अपेक्षित व अभिप्रेत असतांना त्यांनी जाणून बुजून माझ्या वडीलांच्या विरुध्द फौजदारी प्रकरणातील Set Of Facts And Evidence हे जशाला तसे घेवून सदर परिपत्रकांचे उल्लंघन करुन तेपायदळी तुडवून तसेच मा. सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांचेपरिपत्रक क्र. सीडीआर-१९७४/डी मुंबई दि. १३/०९/१९६३ च्या परिपत्रकांचे उल्लंघन करुन
चुकीच्या पध्दतीने बेकायदेशीरित्या विभागीय चौकशी आरंभिली गेली. आणि मा. विशेष पोलीस महानिरिक्षक साहेब, ( L & O ) मुंबई यांचे परिपत्रक क्र. X/१६२८ मुंबई दि.२७ / १२ / १९८५ अन्वये, विभागीय चौकशी बाबत पोलीस अधिक्षक कार्यालयातील लिपीकवर्गास विभागीय चौकशी कामकाजाचे व कायद्याचे कोणतेही ज्ञान नसल्याने त्यांना विभागीय चौकशी कामकाजा पासून दुर ठेवावे असे निर्देश असतांना मा. मनोज पाटील साहेब, सक्षम शिस्तभंग विषयक प्राधिकारी तथा पोलीस अधिक्षक साहेब, अहमदनगर यांनी प्रमुख विभागीय चौकशी लिपिक श्री. शिवाजी फुंदे व कार्यालयीन अधिक्षक श्री. कुसकर यांच्याशी संगनमत करून माझ्या वडीला विरुध्द चुकीच्या पध्दतीचा अवलंब करुन बेकायदेशीरपणे विभागीय चौकशी लावली होती. व ती विभागीय चौकशी ही मा. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांच्याकडे देण्यात आली होती. परंतू सदर विभागीय चौकशीमध्ये चौकशी अधिकारी बदलून मिळावा म्हणून माझ्या वडीलांची कोणतीही विनंती नसतांना देखील माझ्या वडीलांच्या नोकरीवर गदा यावी आणि आमचे संपूर्ण कुटूंब रस्त्यावर
यावे या वाईट व दुष्ट हेतूने प्रेरित होऊन सुड बुध्दीने माझ्या वडिलांविरुध्दची सदर विभागीय चौकशी ही त्यांनी जाणून बुजून मा. अजित पाटील साहेब, विभागीय चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर यांच्याकडे सोपविली होती.
माझ्या वडिलांच्या विरुध्दच्या सदर विभागीय चौकशी मध्ये त्यांनी त्यांच्या बचावासाठी त्यांचे मित्र अधिकारी मापोहवा. नामदेव दगडू लोंढे, मुक्काम पोस्ट खालापुरी, ता. शिरुर
कासार जि. बीड यांच्या मदतीने मा. सातव साहेब आणि नंतरचे विभागीय चौकशी अधिकारी मा. अजित पाटील साहेब यांना वेळोवेळी दि. ०८/१०/२०२१, ०१/११/२०२१, १६/०६/२०२२, २०/०६/२०२२, २२/०६/२०२२, २८/०६/२०२२, ३०/०६/२०२२ आणि दि. १६/०६/२०२२
इत्यादी वेळा बचावासाठी कागदपत्र मिळण्याबाबत विनंती अर्ज करुन देखील मा. अजित पाटील साहेब, विभागीय चौकशी अधिकारी यांनी व शिस्तभंग विषयक पोलीस प्राधिकरणाने कोणतेही कागदपत्रे शेवट पर्यंत पुरविले नाहीत. त्यामुळे माझे वडील त्यांच्या विरुध्दच्या विभागीय चौकशीमध्ये सरकारी साक्षीदारांची उलट तपासणी घेवुन स्वत:चा बचाव करु शकले नव्हते. व दरम्यानच्या काळात मा. अजित पाटील साहेब, यांनी चुकीच्या पध्दतीने व
बेकायदेशीररित्या माझ्या वडीलांविरुध्दची सदर विभागीय चौकशी चालविली होती. त्यावेळी सदर विभागीय चौकशीमध्ये आपणांस धोका होऊन आपल्या नोकरीवर गदा येऊ शकते ही बाब माझ्या वडीलांच्या लक्षात येताच त्यांनी अॅड. विश्वास वाघ साहेब यांच्या मार्फतीने मा.
मॅट औरंगाबाद येथे OA NO. ३६१ / २०२२ अन्वये, मा. मॅट औरंगाबाद येथे सदर विभागीय चौकशीमध्ये अव्हान याचिका दाखल केली होती ती सध्या न्याय प्रविष्ठ आहे. सदर याचिके अन्वये, मा. मॅट औरंगाबाद यांनी माझ्या वडीलांची बाजू ऐकून घेवून सदर विभागीय
चौकशीमध्ये आपण आपल्या शपथ पत्रासह आपले म्हणणे जोपर्यंत मॅट मध्ये दाखल करीत नाहीत तो पर्यंत सदर विभागीय चौकशीमध्ये कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये म्हणून मा. मॅट ने आदेश देवून माझ्या वडीलाविरुध्दच्या विभागीय चौकशीमध्ये दि. २५/०८/२०२२ रोजीच्या आदेशान्वये, मा. मॅट औरंगाबाद यांनी स्टे ऑर्डर दिलेला असतांना देखील त्या स्टे ऑर्डरला न जुमानता आपण जणु काही प्रचलित नियम कायदयापेक्षा आणि मा. मॅट व
न्यायालयापेक्षा आपणच सर्वश्रेष्ठ आहोत असे समजून १) मा. मनोज पाटील साहेब, शिस्तभंग विषयक प्राधिकारी तथा पोलीस अधिक्षक अहमदनगर २) मा. अजित पाटील साहेब, विभागीय चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर ३) श्री. कुसकर कार्यालयीन अधिक्षक ४) श्री. शिवाजी फुंदे, प्रमुख विभागीयचौकशी लिपिक दोन्हीही पोलीस अधिक्षक कार्यालय, अहमदनगर यांनी संगनमत करून माझ्या वडीलाविरुध्दची विभागीय चौकशी चालवून कारणेदाखवा नोटीस सोबत प्रस्तावित शिक्षा आदेश बजाविता येत नसतांना देखील त्यांनी माझ्या वडीलास सेवेतून कमी का करण्यात येऊ नये? अशा आशयाचा प्रस्तावित शिक्षा आदेश आणि त्यासोबत कारणेदाखवा नोटीस
बजावली होती. त्या कारणेदाखवा नोटीसला माझ्या वडलांनी दि. १७/०९/२०२२ रोजी रितसर दोन निवेदनाद्वारे उत्तर सादर करून त्यातील एका पत्रासोबत त्यांच्या विरुध्दचा उपरोक्त गुन्हा कसा खोटा आहे. त्याबाबतची ऑडीयो क्लीप सोबत जोडली होती. परंतू वरील चार ही
अधिकारी / कर्मचाऱ्यांनी मिळून त्या ऑडीयो क्लीप व त्या सोबतचे पत्र माझ्या वडीलांस जाणून बुजून त्रास देण्याच्या हेतूने परत पाठवून दिलेले आहेत. सदर विभागीय चौकशी
दरम्यान माझ्या वडीलांनी मा. अव्वर सचिव साहेब, गृह विभाग, मंत्रालय मुंबई, मा. पोलीस महासंचालक साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि मा. विशेष पोलीस महानिरिक्षक साहेब, नाशिक परिक्षेत्र नाशिक इत्यादी अधिकाऱ्यांना माझ्या विरुध्दच्या विभागीय चौकशीचे
कागदपत्र हे आपण आपल्या कार्यालयात मागवून घेवून त्यांचे अवलोकन करुन गुणवत्तेच्या आधारे मला न्याय मिळवून दयावा म्हणून जे विनंती अर्ज पोलीस अधिक्षक कार्यालय, अहमदनगर यांच्या मार्फतीने पाठविले होते ते सर्वच्या सर्व अर्ज वरिष्ठांना पाठवून देणे आवश्यक असतांना त्यांनी ते अर्ज वरिष्ठांना न पाठविता माझ्या वडीलांना त्रास देण्याच्या त्यांनी ते सर्व अर्ज माझ्या वडीलांना परत पाठवून दिलेले होते व अशाप्रकारे चार ही अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळून माझ्या वडीलांना विभागीय चौकशीमध्ये वारंवार शारिरिक मानसिक व आर्थिक त्रास देऊन माझ्या वडीलांचा अनन्वीत छळ केलेला आहे. ही बाब माझ्या वडीलांच्या बॅग मधील कागदपत्रे मी आज रोजी पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलेली आहे. माझ्या वडीलांविरुध्दच्या सदर विभागीय चौकशी दरम्यान माझे वडील ज्या ज्या वेळी विभागीय चौकशीत तारखेस जात असत त्या त्या वेळी माझे वडील पोहवा. भाऊसाहेब
आघाव, हे मला व माझी आई रंजना भाऊसाहेब आघाव असे आम्हास सांगत की, मा. मनोज पाटील साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. अजित पाटील साहेब, डीवायएसपी अहमदनगर, कार्यालयीन अधिक्षक श्री. कुसकर व प्रमुख विभागीय चौकशी लिपिक श्री.
शिवाजी फुंदे, यांनी राजूर येथील पोलीस अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरुन माझ्या विरुध्द खोटे दोषारोप लावून विभागीय चौकशी लावली आहे. त्यामुळे मी खुप तणावाखाली जीवन जगत आहे. काय होईल कसे होईल? सांगता येत नाही. आणि आता माझा काही भरोसा नाही असे म्हणून ते कायम तणावाखाली राहत असत. त्या त्या वेळी मी व आई मिळून त्यांना समजावून सांगून धीर देत असत व शेवटी माझा आणि वडीलांचा जेव्हा शेवटचा फोन
कॉल झाला त्यावेळी त्यांनी मला उपरोक्त नमूद चार अधिकाया विरुध्द तक्रार सांगून त्या सर्वांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे व तशी मी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. परंतू वरील चारही अधिकारी, कर्मचारी हे भविष्यात तुम्हाला त्रास देतील म्हणून मी त्यांची नावे त्या सुसाईड नोट मध्ये लिहीलेली नाहीत असे सांगून माझ्या वडीलांनी वरील अधिकारी कर्मचारी यांच्या त्रासाला कंटाळून दि. ०१/१०/२०२२ रोजी सकाळी ०९:४५ ते
१०:०० वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या ताब्यातील सव्र्हस एसएलआर रायफल मधून स्वत:ला गोळी मारुन घेवुन आत्महत्या केलेली आहे व माझ्या वडीलांच्या आत्महत्तेस प्रवृत्त केले म्हणून असे मला १) मा. मनोज पाटील साहेब, शिस्तभंग विषयक प्राधिकारी तथा पोलीस अधिक्षक
अहमदनगर २) मा. अजित पाटील साहेब, विभागीय चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर ३) श्री. कुसकर कार्यालयीन अधिक्षक, पोलीस अधिक्षक कार्यालय, अहमदनगर हे तिघे देखील तितकेच जबाबदार आहेत. परंतू
गुन्हयाच्या फिर्यादीमध्ये मी त्यांचे नावे, पत्ते सांगू शकलो नव्हतो. जे आज वडीलांच्या कागदपत्रांची फाईल पाहून खात्री करुन सांगत आहे. तरी विनंती की, माझ्या वडीलांच्या आत्महत्ते संदर्भात पो.स्टे. राहूरी गु.र.नं. ९४४ / २०२० कलम ३०६, ३८५, ३४ भादवि अन्वये
जो गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयामध्ये १) मा. मनोज पाटील साहेब, शिस्तभंग विषयक प्राधिकारी तथा पोलीस अधिक्षक अहमदनगर २) मा. अजित पाटील साहेब, विभागीय १०:०० वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या ताव्यातील सव्हीस एसएलआर रायफल मधून स्वत:ला
गोळी मारून घेवून आत्महत्या केलेली आहे व माझ्या वडीलांच्या आत्महत्तेस प्रवृत्त केले म्हणून असे मला २) मा. मनोज पाटील साहेब, शिस्तभंग विषयक प्राधिकारी तथा पोलीस अधिक्षक अहमदनगर २) मा. अजित पाटील साहेब, विभागीय चौकशी अधिकारी तथा उपविभागीय
पोलीस अधिकारी, नगर प्रामीण विभाग, अहमदनगर ३) श्री. कुसकर कार्यालयीन अधिक्षक, पोलीस अधिक्षक कार्यालय, अहमदनगर हे तिघे देखील तितकेच जबाबदार आहेत. परंतू गुन्हयाच्या फिर्यादीमध्ये मी त्यांचे नावे, पत्ते सांगू शकलो नव्हतो. जे आज वडीलांच्या
कागदपत्रांची फाईल पाहून खात्री करून सांगत आहे. तरी विनंती की माझ्या वडीलांच्या आत्महत्ते संदर्भात पो.स्टे राहूरी गु.र.नं. १४४/२०२० कलम ३०६, ३८५ ३४ भादवि अन्वये जो गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयामध्ये १) मा. मनोज पाटील साहेब, शिस्तभंग विषयक प्राधिकारी तथा पोलीस अधिक्षक अहमदनगर २) मा. अजित पाटील साहेब, विभागीय चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग, अहमदनगर
३) श्री. कुसकर कार्यालयीन अधिक्षक, पोलीस अधिक्षक कार्यालय, अहमदनगर या तिघांची मुख्य आरोपी म्हणून नोंद होवून गुन्हयाचा तपास करावा त्यांच्या विरुद्ध मा. न्यावालवात दोषारोप पत्र पाठवावे आणि आम्हास न्याय मिळवून दयावा अन्यथा आम्ही दि. १०/१०/२०२२
रोजी सकाळी ११:०० वाजता अहमदनगर शिर्डी जाणान्या हायवेवर राहूर येथे सर्व गावक-चांसह रस्तारोको आंदोलन करुत आणि त्या नंतर कोणत्याही प्रसंगी पोलीस अधीक्षक
कार्यालय, अहमदनगरच्या समोर आम्ही संपूर्ण कुटुंबीय आम्तदहन करणार आहोत आणि बाची सर्व जबाबदारी ही आपणावर राहील याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.
माहितीस्तव व योग्यता कार्यवाहीस्तव प्रत :-
१) मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य मुंबई
२) मा. उपमुख्यमंत्री / गृह मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
३) मा. लोकायुक्त साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई
४) मा. पोलीस महासंचालक साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई
५) मा. अपर पोलीस महासंचालक साहेब, राज्य गुन्हे अन्वेशन विभाग, महाराष्ट्र राज्य,
पुणे
६) मा. महसूल आयुक्त साहेब, महसूल आयुक्तालय, नाशिक
७) मा. जिल्हाधिकारी साहेब, अहमदनगर
८) मा. पोलीस अधिक्षक साहब, अहमदनगर
९) मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब, अहमदनगर
१०) मा तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय, राहूरी
११) मा. पोलीस निरिक्षक साहेब, पो.स्टे. राहूरी यांना सादर