Home Uncategorized अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अस्थिरोग व हृदयरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन संपन्न...

अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अस्थिरोग व हृदयरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन संपन्न युवकांमध्ये मधुमेह व हृदयरोगचे वाढते प्रमाण चिंताजनक : भिंगार कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे

अहमदनगर – :दि.१९ ऑक्टोबर
युवकांमध्ये वाढत असलेले मधुमेह , हृदय रोगाचे प्रमाण आपल्यासमोर चिंताजनक बाब आहे  यासाठी योग्य आहार व व्यायामाचे खरी गरज आहे नगर जिल्ह्यामध्ये एकच छता खाली सर्व आरोग्य सुविधा मिळणारे ठिकाण म्हणजे अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू झाले आहे सर्वसामान्य रुग्णांना शिबिराच्या माध्यमातून मोफत आरोग्य सुविधा देण्याचे काम करत आहे ही कौतुकास्पद बाब आहे आपल्यासमोर रस्ता अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे यामध्ये मृत्युदर ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे रस्ता अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमाची नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे हेच काम अरुणोदय सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आरोग्याच्या उपचाराबरोबर  नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे असे प्रतिपादन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी केले.

अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत अस्थी रोग व हृदयरोग  तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता लहामगे, छत्रपती पुरस्कार विजेते निर्मलचंद्र थोरात, हॉस्पिटलचे संचालक डॉ शशिकांत फाटके व डॉ वंदनाताई फाटके, अभिजीत खोसे, नरेंद्र बाफना, दत्ता गाडळकर, ज्ञानेश्वर रासकर, डॉ योगिता सत्रे, डॉ रणजीत सत्रे, डॉ सुदाम जरे, ॲड शारदाताई लगड, डॉ निखिल गांधी, डॉ प्रशांत आंधळे, सुधीर लांडगे, राजू बलदोटा,शरद माने, विलास शिंदे,  डॉ योगेश चिपाढे, साहेबान जागीरदार, संकेत गुंदेचा, हेमंत गुगळे, सुधाकर बोरुडे, महेश अनमल, मिलिंद क्षीरसागर, मनोज खेडकर, अभी गांगर्डे,रवी राठोड, अविनाश साळुंखे, राजू बेंद्रे, सागर फुलसौंदर, संदीप कोकाटे, अमित धाडगे, भारत सुपेकर, मयूर मोठे व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते
डॉ शशिकांत फाटके म्हणाले की अरुणोदय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरामध्ये सर्वसामान्य रुग्णांनी मोठ्या प्रमाणात भाग घेऊन तपासणी व उपचार करून घेतले आहे त्यामुळे मनाला एक समाधान वाटले आहे लवकरच सर्वसामान्य रुग्णांना या ठिकाणी महात्मा फुले जीवनदाई योजनेच्या माध्यमातून उपचार अल्प दरात दिले जाणार आहे नगर जिल्ह्यात सुसज्ज अशी पहिली कॅथलॅब येत आहे यामध्ये  हृदय बरोबर मेंदूच्या शस्त्रक्रियाही होणार आहे आरोग्य सुविधेतून अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांच्या विश्वासाला पात्र  ठरेल असे ते म्हणाले

  यावेळी या शिबिराचे डॉ.वंदनाताई फाटके यांनी सर्वांचे आभार मानले

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version