Home क्राईम दरमहा लाख रुपये दे…. बांधकाम व्यवसायिकांची ‘त्या’ नगरसेवकाच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे धाव

दरमहा लाख रुपये दे…. बांधकाम व्यवसायिकांची ‘त्या’ नगरसेवकाच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे धाव

अहमदनगर दि.१९ ऑक्टोबर –

केडगाव येथील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसाय करत आहेत, केडगाव मध्ये बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर दरमहा एक लाख रुपये द्यावे लागेल ‘जर तुम्ही हे पैसे दिले नाही तर’ महापालिकेच्या कोणत्याही बांधकाम परवाने व इतर सुविधा दिल्या जाणार नाहीत, केडगाव भागात साईराज कन्ट्रक्शन या नावाने विविध बांधकाम प्रकल्प सुरू आहेत या सर्व प्रकल्पावर जाऊन नगरसेवक शिवीगाळ करून धमकावत आहेत, हा व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा असून माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. माझ्या बांधकामाच्या ठिकाणावर बळजबरीने साहित्य चोरून नेण्याचे काम तो करत असतो, मी दिसेल त्या ठिकाणी मला आडवुन शिवीगाळ व दमदाटी करत असतो, रात्री – अपरात्री फोन करून धमकी देण्याचे सत्र या नगरसेवकाकडून सुरू आहे. याच्या त्रासाला आमचे संपूर्ण कुटुंबीय त्रस्त झाले आहे. नगरसेवक हा परिसराचा प्रतिनिधी असून विकास कामांकडे लक्ष देण्यापेक्षा खंडणीगोळा करण्यातच मग्न आहे या खंडणीखोर नगरसेवकामुळे बांधकाम व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.

 

केडगाव उपनगर हे विकसित होत असून या नगरसेवकाच्या त्रासामुळे नागरिकासह व्यावसायिक भयभीत झाले आहेत त्यामुळे केडगावचा सुरू झालेला विकास खुंटण्याची दाट शक्यता आहे. तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकावर पोलीस प्रशासनाने कायदेशीर रित्या कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे बांधकाम व्यावसायिक राजेंद्र पवार यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version