प्रोफेसर कॉलनी चौक येथील मनपाच्या नाट्यसंकुलनाची पाहणी
अहमदनगर दि.९ नोव्हेंबर – अहमदनगर महानगरपालिकेच्या नियोजित नाट्यगृहाच्या बांधकामाची पाहणी आणि रंगभूमी दिनाचे औचित्य साधून नटराज पूजनाचा कार्यक्रम आ.श्री.संग्राम भैय्या जगताप याच्या हस्ते,प्रसिद्ध उद्योजक आणि चित्रपट निर्माते श्री.नरेंद्र फिरोदिया, मा.नगरसेवक श्री.अजिंक्य बोरकर, जेष्ठ नाट्यकर्मी श्री.मधुसूदन मुळे, श्री.अय्युब खान,रसिक ग्रुपचे अध्यक्ष श्री.जयंत येलूलकर ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री.अमोल खोले, प्रमुख कार्यवाह श्री.सतीश लोटके, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे समन्वयक श्री.शशिकांत नजान
यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रोफेसर चौक येथील नियोजित नाट्यगृहात संपन्न झाला.
यावेळी बोलताना आ.श्री.संग्राम जगताप म्हणाले की अहमदनगर महानगरपालिकेचे हक्काचे नाट्यगृह व्हावे यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला,निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले.या उपक्रमाला मूर्त स्वरूप येत आहे. शहरातील सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीला हक्काचे नाट्यगृह असणे अत्यंत गरजेचे असून कलाकारांची ही रास्त मागणी आहे.
वीज,रस्ते,पाणी या मूलभूत गरजा आहेत तितकीच सांस्कृतिक क्षेत्राला गती देने गरजेचे आहे.कलाकार आणि त्यांची कला,त्यांचे विचार आपण जपले पाहिजे हाच आपल्या शहराचा सांस्कृतिक ठेवा आहे.अहमदनगर शहरातील कलाकार आपले नावलौकिक वाढवीत आहेत त्यांना बळ देणे मी माझे कर्तव्य समजतो.यापुढील रंगभूमी दिन आपल्या हक्काच्या नाट्यगृहात व्हावा यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील असे आ.श्री.संग्राम जगताप यांनी सांगितले.
या वेळी बोलताना श्री.नरेंद्र फिरोदिया म्हणाले की कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्पर्धात्मक कार्यक्रम राबविताना पुढे टीव्ही मालिका,चित्रपट माध्यम, ओ.टी.टी. माध्यमातून आपल्याच शहरातून विविध उवक्रम हाती घेण्यात आले आहेत.नगरचे कलाकार आणि त्यांची कलाकृती राष्ट्रीय पुरस्कारा पर्यंत मजल मारतात ही भविष्यात मोठं यश मिळविण्याची नांदी आहे.
यावेळी बोलताना श्री.शशिकांत नजान म्हणाले की हौशी रंगभूमी,व्यावसायिक रंगभूमी पासून ते पुढे मालिका,चित्रपट क्षेत्रात आपल्या कलाकारांनी प्रगती सिद्ध करून दाखविली आहे.आपल्या शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचे भविष्य उज्वल आहे.
सुत्रसंचलनातून .जयंत येलूलकर यांनी नगरच्या नाट्य क्षेत्राचा इतिहास ते नवोदित कलाकारांनी मिळविलेले चौफेर यश यावर प्रकाश टाकला कला आणि कलाकार आपला सांस्कृतिक ठेवा आहे तो आपण जपला पाहिजे अशी भावना श्री. येलूलकर यांनी व्यक्त केली.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री.अमोल खोले यांनी प्रास्ताविक केले.प्रमुख कार्यवाह श्री.सतीश लोटके यांनी स्वागत केले तर जेष्ठ रंगकर्मी श्री.मधुसूदन मुळे यांनी आभार मानले. यावेळी आ.श्री.संग्राम जगताप आणि श्री.नरेंद्र फिरोदिया यांचे हस्ते ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री.अय्युब खान,श्री.मधुसूदन मुळे, कुंकुमार्चन या राष्ट्रपती पदक विजेत्या लघुपटाचे कलाकार दिग्दर्शक श्री.अभिजित दळवी, तांबोळी,.प्रणित मेढे,तसेच उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नाट्यगृहाच्या बांधकामाची पाहणी करण्यात आली.नाट्यगृह कसे असावे,यात काय सुविधा असाव्यात या बाबत आ.श्री.संग्राम जगताप यांनी कलाकारांकडून माहिती घेतली व या सूचना संबंधित ठेकेदार यांना करू असे सांगितले.
यावेळी नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य .सतीश शिंगटे,नाट्य परिषद महानगर शाखेचे अध्यक्ष .क्षितिज झावरे,चित्रपट निर्माते .स्वप्नील मुनोत,नाट्य कलाकार .श्रेणीक शिंगवी, .नाना मोरे,.अनंत रिसे,.गजेंद्र क्षीरसागर, .अमित खताळ,.स्वप्नील नजान,.गणेश लिमकर,.सारंग देशपांडे,.तुषार देशमुख,.अनिरुद्ध तिडके,.सतीश पवार,.विकास गोसावी,.शुभम घोडके,.सृज्ञ टोम्पें कु.सिद्धी कुलकर्णी, रेणुका भिसे उपस्थित होते