Homeविशेषआयपीएल सामन्यांचा आनंद घ्या सट्टेबाजी करू नका त्यामुळे एखादा परिवार सर्वस्व गमावून...

आयपीएल सामन्यांचा आनंद घ्या सट्टेबाजी करू नका त्यामुळे एखादा परिवार सर्वस्व गमावून मानसिक व आर्थिक संकटात येऊ शकतो.. त्या सामाजिक संघटनेचा मेसेज होतोय सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल

advertisement

अहमदनगर दि २ मे
आयपीएल सीझन सुरू झाला असून या आयपीएल सीझनमध्ये कोणाचे मनोरंजन होते कोणी पैसे कमवत आहे तर कोणाचे घर बरबाद होत आहेत. असे वेगवेगळे परिणाम या आयपीएल सामन्यांमुळे सध्या समाजावर होत असताना मात्र या आयपीएलमधून पैसा आणि पैसा मधून खेळ हाच प्रकार सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे. आयपीएल सामने सुरू झाल्यावर अनेक लोक कामधंदे सोडून मोबाईलवर सामने पाहतानाच चित्र आपल्याला ठीक ठिकाणी दिसून येतं मात्र या सामन्यांमधून आनंदा बरोबर अनेक लोक कर्जबाजारी होत आहेत हे तेवढेच कटू सत्य आहे.

याबाबत सरकारचे धोरण अजून काही समजायला तयार नाही आयपीएल सट्टेबाजी जोरात सुरू असताना सरकार याबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे एक तर सरकारने हा सट्टा बाजार कायदेशीर करावा अथवा या सट्टा बाजारावर कायदेशीर बंदी घालावी कारण या सत्ता बाजारामध्ये काही ठराविक लोक प्रचंड गब्बर होत असताना अनेक लोक कर्जबाजारी होत आहेत आणि अनेक घरातील तरुण बरबाद होतानाचे चित्र दरवर्षी पाहायला मिळते.

नगर शहरात ठराविक तीन चार सट्टेबाज मोठे गब्बर झाले असून त्यांचे प्रेम अनेकांवर असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही संपूर्ण नगर शहराला जी गोष्ट माहित आहे ती पोलीस प्रशासनाला कशी माहीत होत नाही हे समजायला तयार नाही मात्र आता या आयपीएल विरोधात सोशल मीडियावर चांगल्या पोस्ट व्हायरल होत असून या आयपीएल मॅच मधून आनंद घ्या कर्जबाजारी होऊ नका अशा विविध पोस्ट सध्या विविध संघटना व्हायरल करत आहेत.
अहमदनगर शहरातील एका युवा आणि महिला मंच समाज संघटनेच्या वतीने एक मेसेज व्हायरल केला जात असून हा मेसेज चांगले प्रभोदन करणारा आहे.असा आहे त्या मेसेजचा मायना
सर्व मित्र परिवार ला नमस्कार
IPL सुरु आहे आणि जोरात चालु आहे पण हे सर्व चालु असताना आज काल ची मुल ह्या मॅचेस् वर बेटींग करतात व त्या मधे आपले सर्वस्व गमावतात व त्यांमुळे सर्व परिवार मानसिक व आर्थिक संकटात येतो तरी सर्व पालकांना विनंती आहे की शक्य असेल तर IPL च्या मॅचेस पाहाण टाळा व आपल्या मुलांवर लक्ष ठेवा मनोरंजन साठी असलेला खेळ तुमच्या करीता अडचणीचा विषय होणार नाही ह्याची काळजी घ्या….

हा मेसेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे मात्र तरीही आयपीएल सट्टा अहमदनगर शहरात जोरदार सुरू असून आयपीएल सट्टेबाजी करणाऱ्या “डॉन” लोकांवर पोलीस कधी कारवाई करतात की आता पोलिसांना थेट आयपीएल सट्टा घेणाऱ्यांचा पत्ता द्यावा लागेल तरच कारवाई होईल का असा प्रश्न पडतोय?

समाज हळूहळू का होईना आयपीएल सट्टेबाजी बाबत जागृत होताना दिसतोय अनेकांचे घर या आयपीएल सट्टेबाजी मुळे बरबाद झालेली आहेत मात्र आता पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करून सट्टेबाजार करणाऱ्यांवर जरब बसवायला पाहिजे

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular