अहमदनगर दि.१ मे
मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे अहमदनगर शहरातील एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या अतुल रमाकांत कांबळे या तरुणाची मुत्रपिंड प्रत्यारोपण प्रक्रिया पार पडली असून या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून सुमारे दोन लाख रुपयांची सहायता निधी अतुल रमाकांत कांबळे याला देण्यात आली होती. त्यामुळे ही शस्त्रिया पार पडली असून याबाबत अतुल रमाकांत कांबळे याचे वडील रमाकांत कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या प्रक्रियेत सहभागी असलेले खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,मंगेश चिवटे, रामहरी राऊत, अनिकेत कराळे आणि सिव्हिल हडको परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे काका शेळके यांचे आभार मानले आहेत.
अतुल कांबळे हा मूत्रपिंड विकाराने आजारी पडला होता त्यामुळे त्याच्यावर रक्त बदल प्रक्रिया सुरू होती तसेच मूत्रपिंड बदलण्याची शस्त्रक्रिया म महाग असल्याने कांबळे कुटुंबीय चिंतेत सापडले होते घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे एवढे पैसे त्वरित उभा करणे हे एक मोठे आव्हान कांबळे कुटुंबियांसमोर असतानाच त्यांना देव रूपाने मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपाध्यक्ष
काका शेळके यांच्यासारखा माणूस मदतीला धावला. रमाकांत कांबळे मदत मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांची आणि सामाजिक कार्यकर्ते काका शेळके यांची भेट झाल्यानंतर काका शेळके यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि अतुल कांबळे यांच्या मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी दोन लाख रुपयांचा मुख्यमंत्री सहायता निधी मिळवून दिला आणि अतुल कांबळे याच्यावर औरंगाबाद येथे शस्त्रक्रिया पार पाडून त्याचे मूत्रपिंड प्रत्यापरण शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे अतुल याला दुसरे जीवन मिळाले तर कांबळे कुटुंबीयांना मोठा आधार मिळाल्याने कांबळे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक कार्यकर्ते काका शेळके यांचे आभार मानले आहेत तसेच मोठ्या संकटातून कुटुंबीयांना बाहेर काढल्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचे सदैव ऋणी राहू असे प्रतिक्रिया कांबळे कुटुंबियांनी दिली आहे.
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात ज्या लोकांना वैद्यकीय मदतीची गरज असेल त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून मदत मिळवण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष काका शेळके यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.