अहमदनगर दि.२० एप्रिल
अहमदनगर शहरात तरुणांना कर्जबाजारी करणाऱ्या व्यसनाच्या आहारी लावणाऱ्या बेकायदेशीर सावकारी गुंडागर्दीची खरे मूळ असणाऱ्या आयपील सट्टेबाजी वरील कारवाई सुरू आहे मात्र यात छोटे छोटे लोकच पकडले जात आहेत खरे बुकी आणि याचे मेन व्यवहार करणारे मात्र मोकळेच फिरताना दिसतात या म्होरक्यांवर कारवाई झाल्या शिवाय सट्टेबाजी कमी होणार नाही हे तितकेच सत्य आहे.
अहमदनगर शहरतील मध्यवर्ती भागात एक मोठा आयपील सट्टेबाजी घेणार बुकी आहे तसेच मार्केटयार्ड परिसरात सावेडी भागात असे मोजकेच चारपाच म्होरके आयपीएलचा काळाबाजाराची सूत्रे हलवत आहेत. मात्र यांच्यावर कारवाई का होत नाही हा मोठा प्रश्न आहे.
आयपील सिजन सुरू झाला की पंधरा दिवसांनी महागडे मोबाईल,दुचाकी,चारचाकी,सोने आशा वस्तू ठेऊन खाजगी सावकारकी जोरात सुरू असते.
बिंगो आणि सट्टेबाजी यावर खुद्द भाजपचे खासदार सुजय विखे यांनी वाचा फोडली त्या नंतर कुठे तरी छोट्या सट्टेबाजी करणाऱ्यावर कारवाई सुरू केली आहे मात्र मोठ्या माशांवर कारवाई कधी होणार?