Homeविशेषनगर शहरातील सर्वच मिरवणुकीचा मार्ग बदलायाला हवाय का ? महापुरुषांना अभिप्रेत अशा...

नगर शहरातील सर्वच मिरवणुकीचा मार्ग बदलायाला हवाय का ? महापुरुषांना अभिप्रेत अशा मिरवणुका खरंच होतात का फक्त ताकद दाखवण्यासाठीच मिरवणुकीचा फार्स !

advertisement

अहमदनगर दि.२० एप्रिल
अहमदनगर शहरात अलीकडच्या काळात अनेक मिरवणुका निघू लागल्या आहेत आणि विशेषता या सर्व मिरवणुका नगर शहरातल्या मुख्य मार्गांवरुनच जात आहेत तो मार्ग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते पंचवीर चावडी आशा टॉकीज चौक, कापड बाजार, तेली खुंट चितळे रोड, चौपटी कारंजा आणि पुढे दिल्ली गेट येथे या मिरवणुकांचे विसर्जन होते. हा मार्ग जरी असला तरी अनेक मिरवणुका या चितळे रोड पर्यंत येऊनच विसर्जित होतात कारण तोपर्यंत मिरवणुकीला दिलेला वेळ संपलेला असतो त्यामुळे या मिरवणुका बहुतांश पूर्ण होतच नाहीत.

बरं आज कालच्या या मिरवणुकां मध्ये मध्ये मग ती मिरवणूक कोणतीही असो या मिरवणुकांमध्ये पाहायला मिळतो तो फक्त नाच चित्रपटातील गाण्यांवर तरुणाई धुंदपणे गाण्यांवर विचित्रपणे नसताना दिसते मात्र इतिहासकाळात डोकून पाहिले तर तेव्हा मिरवणूक होती ना नाच गाणे होते मिरवणुका काढायचा उद्देश एवढाच होता की यामधून काही समाज प्रबोधन गोष्टी नागरिकांपर्यंत पोहोचवणे ज्या महापुरुषांची मिरवणूक काढली आहे त्या महापुरुषांचा इतिहास नवीन पिढीला समजावा एखाद्या धार्मिक सण असेल तर एकत्रपणे साजरा करावा यासाठी सार्वजनिक उत्सव सुरू करण्याची परंपरा होती काही काळापूर्वी जेव्हा विविध महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरा होत असताना त्यांच्या जीवनावरील पोवाडे किंवा त्यांनी केलेली महान कार्य याची गाणे किंवा त्या महान थोर पुरुषांची पथनाट्य द्वारे समाज जागृती करणे अशा गोष्टी पाहायला मिळत असत. मात्र आजकाल या सर्व गोष्टींना तिलांजली देत चित्रपटातील डिजे वरील कर्कश आवाजात अश्लील गाण्यांवर तरुणाई झिंगत असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार येणारे कुटुंब आता रस्त्यांवर दिसत नाहीत. रस्त्यांवर दिसतात ते फक्त तरुण मुलं आपल्या घरातील महिलांना अशा मिरवणुका पाहायला घेऊन येण्यासाठी अनेक लोक आता धाजवत नाहीत कारण या ठिकाणी फक्त धांगडधिंगास दिसतो.

नगर शहरातील निवडणुका या शहरातील बाजारपेठेतून जात असून याला अनेक वर्षांपासूचा इतिहास आहे मात्र इतिहास कधीकधी बदलावा लागतो मिरवणूक म्हंटलं की आजकाल कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सर्व बाजारपेठेतील रस्ते आणि मिरवणूक मार्गावरील रस्ते बंद केली जातात त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार त्या काळापुरता ठप्प होतो आणि त्यानंतर जर काही घटना घडली तर त्याचा सर्व परिणाम बाजारपेठेंवर होतो आधीच्या काळामध्ये रस्ते बंद करण्याची पद्धत नव्हती मात्र अलीकडच्या काळात मिरवणुकीदरम्यान चुकीच्या घटना घडल्यामुळे पोलिसांना खबरदारी म्हणून सर्वच रस्ते बंद करावे लागतात त्यामुळे नगर शहरातील सर्वच व्यवहार ठप्प होतात आणि याचा परिणाम बाजारपेठेतील अर्थकारणावर होतो.

नगर शहरातील निघणाऱ्या सर्वच मिरवणुकीचा मार्ग पाहिले तर अत्यंत छोटे आणि अडचणीचे आहेत. आणि जर मिरवणुका काढायच्या असतील तर त्या सुटसुटीत मार्गांवरून काढल्या तर कायदा सुव्यवस्था बरोबरच मिरवणुका काढणाऱ्यांना आणि इतर नागरिकांना कोणालाच याचा त्रास होणार नाही याचा विचार आता नगरकरांनी करण्याची गरज आहे.त्यामुळे मिरवणूक मार्ग बदलायला हवा याबद्दल आता हळूहळू चर्चेला सुरुवात झाली आहे आणि तसे होणे ही काळाची गरज आहे.

नगर शहर आता मोठ्या प्रमाणात भौगोलिक दृष्ट्या मोठे होत चालले आहे. केडगाव ,सावेडी उपनगर तसंच अनेक उपनगर आता मोठी होऊ लागली आहेत. त्यामुळे उपनगरांमध्ये मिरवणुकांचा सिलसिला सुरू झाला असून त्यामुळे नगर शहरातील मिरवणुकांमधील गर्दी कमी होऊ लागल्याचे चित्र अलीकडच्या काळात दिसू लागले आहे. फक्त नावासाठी मिरवणुका न काढता समाज प्रबोधन करण्यासाठी नवीन पिढीला मागील इतिहास कळण्यासाठी धार्मिक सण उत्सव काय असतो हे समजण्यासाठी मिरवणुकीदरम्यान प्रबोधन होणे गरजेचे आहे.

अलीकडच्या काळात मिरवणूक म्हणले की पोलिसांच्या डोक्याला एक मोठा ताप असतो कारण अनेक वेळा या मिरवणुकीनदरम्यान धार्मिक तणाव निर्माण होऊन कायदा संस्था बिघडण्याची शक्यता असते. जर ज्या ठिकाणी मोठा मार्ग असेल त्या ठिकाणी मिरवणूक आणल्या तर कायदा सुव्यवस्थासह सर्व नागरिकांना मिरवणुका पाहायला मिळतील मात्र त्यासाठी नगर शहरातील विविध मंडळ राजकीय पक्ष विविध संघटना यांनी एकत्र येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे याचे स्वागत सर्वसामान्य जनता ,पोलीस प्रशासन नक्कीच करेल.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular