Homeजिल्हासरकारने आयपीएल सट्टेबाजी अधिकृत केली तर सरकारी तिजोरी भरेल तरी .. सध्या...

सरकारने आयपीएल सट्टेबाजी अधिकृत केली तर सरकारी तिजोरी भरेल तरी .. सध्या आयपीएल सट्टेबाजी चालू ठेवण्याचे पैसे इतरच खिशात जात आहेत….डॉन मोहन अध्यापही मोकळाच…

advertisement

अहमदनगर दि.१ मे

आयपीएल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होऊन बरोबर एक महिना होऊन गेला आहे या एक महिन्यांमध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर अब्जावधी रुपयांचा सट्टा लागला असून पुढील 28 दिवसात हे चित्र असेच पाहायला मिळणार आहे. या दोन महिन्यात अनेक थरारक आणि शेवटच्या चेंडूवर वेगळच वळण घेणाऱ्या सामन्यांचे चित्र पाहायला मिळणार आहे.कारण अशा शेवटच्या चेंडूवरच आयपीएल सट्टा लावणाऱ्या बुकींचे भवितव्य अवलंबून असतं.

आयपीएल मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना करोडो रुपये मिळतात अनेक लोक हे सामने पाहण्यासाठी हजारो रुपये खर्च करून स्टेडियमवर जात असतात मात्र अंधारात या आयपीएल मॅचवर सट्टेबाजीच्या माध्यमातून रुपये कमवणाऱ्या बुकिंगचे वेगळे साम्राज्य असते. या आयपीएल सीझनमध्ये एक वर्ग अत्यंत श्रीमंत होत जातो तर एक वर्ग कर्जबाजारी होत जातो. मात्र या गांभीर विषयाकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही. सरकारने ही आयपीएल सट्टेबाजी किमान अधिकृत केली तर सरकारी तिजोरीत याचा काही हिस्सा जाऊ शकतो कारण हा हिस्सा सध्या इतर लोकांच्या खिशात जात असल्याने काही न करता अनेक लोक लाखो रुपये कमवत आहेत. या आयपीएल सट्टा मध्ये खेळणारा माणूस कधी जिंकत नाही मात्र खेळवणारा माणूस नेहमीच जिंकत राहतो हे सत्य आहे. कारण सट्टेबाजी ही फक्त क्रिकेट सामन्यांवर तर होत नाही जगामध्ये जेवढे सामने खेळले जातात तेवढ्या सामन्यांवर सट्टेबाजी होत राहते बारा महिने ही सट्टेबाजी चालूच राहते.

मागील वर्षी या आयपीएल सट्टामुळे नगर मधील एका तरुणाने आत्महत्या सर्वकाही चिठ्ठीत लिहून ठेवले होते कशाप्रकारे आयपीएल सट्टा मध्ये तो गुंतत गेला खाजगी सावकारी आणि त्यानंतर लागलेला पैशांचा तागादा आणि अखेर त्याने गमावलेले प्राण त्याची आई आजही सर्व गोष्टी सांगत आहे. मात्र हे प्रकरण दडपले गेले हे कोणाच्या माध्यमातून ते सांगायला नको . मात्र असे अनेक तरुण दरवर्षी आपला जीव देतात मात्र काही लोकांना पैसे देऊन असे प्रकरण दाबले जाते त्यामुळे हे प्रकरण बाहेर येतच नाहीत.मात्र दुसऱ्याच्या टाळूवरचं लोण खाऊन हे लोक जगतात कसे ? आणि समाजात व्हाईट कॉलर घेऊन मिरवतात याचीच खंत वाटते ! जे कुंपण आपण आपल्या सुरक्षेसाठी बनवलेले असते तेच कुंपण शेत खात असेल तर त्या कुंपणावर तरी काय विश्वास ठेवायचा! मात्र एक ना एक दिवस या सर्व गोष्टी समोर येणारच आणि नगर मधील म्होरक्या मोहनचा खरा चेहरा नगरकरांना समजणारच अनेक तरुणांना कर्जबाजारी करणाऱ्या मोहन सारख्या आणखीन चार-पाच आयपीएल सट्टा बुकिंवर कधी न कधी कारवाई तर होईलच ना !

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular