अहमदनगर दि.१६ सप्टेंबर
जुलैमध्ये घेण्यात आलेल्या नीट (NEET ) परीक्षेत येथील जे. जे. सायन्स अॅकॅडमीतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून, यंदा निकालाने उच्चांक गाठला. ॲकॅडमीतील ,(Academy ) विद्यार्थ्यांनी चांगले सुयश संपादन करीत जिल्ह्यात आघाडीवर आहेत. प्रताप मगर याने ७२० पैकी ६७५, आभा देशमुख ६६६, श्रेया खणकर ६६६, अर्णव पाटील ६३०, पियुष काशिद ६२०, तेजस ढगे ६०७, वरद पटारे ६०५, यशश्री आंधळे ५९५, शशांक कंक ५९०, साक्षी कराळे ५८०, सुमित वराट ५७५, संकेत सोनवणे ५६३, अमेय एरंडे ५५२ यांच्यासह इतरांनीही गुण मिळवित टॉपर्सचा बहुमान मिळविला.
संचालक योगेश जहागिरदार यांनी सांगितले की जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी यासाठी पात्र व्हावेत, हे आमचे ध्येय आहे. ॲकॅडमीतील विद्यार्थी
मोठ्या संख्येने मेडिकलला (Medical )पात्र ठरले असून, अॅकॅडमीतील सर्वच प्राध्यापक मुंबई येथील असून, त्या त्या विषयातील तज्ज्ञ व अनुभवी आहेत. परीक्षेसाठी विशेष तयारी अॅकॅडमीने करून घेतल्याचे संचालक डॉ. कृष्णकांत झा यांनी केले. डॉ. झा यांच्या मार्गदर्शनामुळे (Guidance ) आमचे यश सुकर होऊ शकल्याचे प्रताप मगर याने सांगितले. त्यांनी योग्य मार्गदर्शनाबरोबरच उत्साह टिकवून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. अॅकॅडमीने रिविजन, टेस्ट यावर भर दिला. त्याचा परीक्षेत चांगला उपयोग झाला, असे तो म्हणाला. आभा देशमुख, श्रेया खणकर यांनी यशाचे श्रेय अॅकॅडमीतील शिक्षक व पालकांना दिले. त्यामुळेच आम्हाला यश मिळाल्याचे सांगितले.