अहमदनगर दि.२२ डिसेंबर –
अहमदनगर शहरात थंडी सुरू झाल्याने शहराचे तापमान गारठत असताना अंध,दिव्यांग, निराधार व वंचित घटकातील नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. शहरांमध्ये अंध,अपंग,निराधार व वंचित घटकातील अनेक ज्येष्ठ नागरिक रेल्वे स्टेशन, बस स्टँड व रस्त्याच्या कडेला उघड्यावर झोपून आपले जीवन जगत असुन वाढती कडाक्याची थंडी पाहता अंगात हुडहुडी भरत आहे. उघड्यावर झोपणारयांना मायेची ऊब मिळावी म्हणून नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते अल्तमश जरीवाला मित्र परिवाराच्यावतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
अल्तमश जरीवाला यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे. अत्यंत निस्वार्थ अशी समाजसेवा ते दशकभरा पासून करत आहेत. समाजसेवेचा वारसा त्यांना कुटुंबातून लाभला आहे. यावेळी अल्तमश जरीवाला समवेत अँड.अशरफ शेख, समीर बेग, तनवीर भंगारवाले, समीर शेख, शफाकत हुंडेक़री, अलतमश शेख, मुद्दसर जहागिरदार, नदीम बागवान, मुन्तज़िर खान, मोईन कुरेशी, आवेज़ खान, रहीम शेख, फरहान खान, शहेबाज कुरेशी, इमरान तांबोली, वसीम शेख, फ़ज़ल कराचीवाला, अरबाज़ बागवान, मुबीन सय्यद, रईस खान व आदि मोठा मित्र परिवार उपस्तिथ होते.