अहमदनगर दि.२१ डिसेंबर
राज्य उत्पादन शुल्क, ब-विभागाने जामखेड करमाळा रोडवर राजेवाडी फाटा बसस्टॅण्ड समोर एका वाहनावर कारवाई करत दारूच्या बाटल्यांसह वाहन जप्त करून सुमारे एकूण ६,३०,०००/- रुपयांचा गोवा राज्य निर्मितीचा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहिती नुसार जामखेड येथील राजेवाडी शिवारात मातोश्री मंगल कार्यालयाच्या जवळ अवैध मद्याची वाहतुक करीत असताना वाहनाचा पाउलाग केला आणि वाहन ताब्यात घेतले असता त्या मध्ये गोवा राज्य निर्मितीचा विदेशी मद्याचा साठा मिळून आला.
या मध्ये १२०० इंपिरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या बाटल्या ,लाल रंगाची चारचाकी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ परराज्यातील मद्य महाराष्ट्र मध्ये आणून त्याची अवैध विक्री करण्यासाठी हे मद्य आणण्यात आले होते.
या प्रकरणी अप्पसाहेब महादेव कुमटकर (रा. राजेवाडी, ता.जामखेड, जि. अहमदनगर ) या आरोपीस अटक करण्यांत आलेली असून आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद १९४९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यांत आलेला आहे.या प्ररकणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क ब-विभागाचे निरीक्षक जी. टी.खोडे करत आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक, (अंबलबजावणी व दक्षता) सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त अनिल चासकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अहमदनगर जिल्ह्याचे अधीक्षक गणेश द पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यांत आली.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, ब विभागाचे निरीक्षक जी.टी. खोडे,दुय्यम निरीक्षक डि. आर. ठोकळ, दुय्यम निरीक्षक,आर. पी. दांगट, दुय्यम निरीक्षक, टी. वी. करंजुले, पी. डी. गदादे, जवान श्री. डी.ए. खैरे, जवान
एस.ए. पवार, महिला जवान श्रीमती. सुनंदा अकोलकर यांनी कारवाई मध्ये सहभाग घेतला होता.