अहमदनगर दि.१ फेब्रुवारी
अहमदनगर मधील एका तुरुंगात दोन कैद्यामध्ये जोरदार मारहाण झाल्याची चर्चा सध्या सुरू असून नगर मधील एका बहु चर्चित खून प्रकरणातील आरोपी आणि नगर तालुक्यातील कुख्यात गुंड यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसन तुंबळ हाणामारी झाली आहे.
याप्रकरणी आता दोन्ही बाजूंचे जवाब घेण्याची प्रक्रिया सुरू असून यानंतर न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात येणार आहे या प्रकारामुळे दोन्ही कैदी आता बाहेर पाठवण्याची तुरुंग प्रशासनाची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.