Home शहर काळ्या यादीत असणाऱ्या ठेकेदाराची निविदा बाद करावी काका शेळके यांचे मनपा प्रशासनाला...

काळ्या यादीत असणाऱ्या ठेकेदाराची निविदा बाद करावी काका शेळके यांचे मनपा प्रशासनाला निवेदन कचरा संकलन ठेका निविदा प्रक्रिया वादात सापडण्याची शक्यता

अहमदनगर दि.१७ नोव्हेंबर
नगर शाहरतील कचरा संकलनाच्या ठेक्या बाबतीत निविदा प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

महानगरपालिकेने राबवलेल्या निविदा प्रक्रियेत तीन निविदा प्राप्त झाल्या असून तीन पैकी एक निविदाकार काळ्या यादीतील असल्याने निविदा प्रक्रिया रद्द करुन फेर निविदा प्रसिध्द करावी अशी मागणी शिंदे गटाचे सावेडी उपनगर प्रमुख काका शेळके यांनी महानगर पालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.

अहमदनगरची संपुर्ण शहरातील कचरा संकलन व वाहतुकीबाबत ई-निविदा प्रसिध्द होवुन १६ नोव्हेंबर
रोजी उघडण्यात आली होती . या निविदेत एकुण तीन निविदा प्राप्त आहे त्यापैकी एक बी.वी.जी.इंडीया
लिमिटेड, पुणे-मुबंई रोड, चिंचवड, पुणे यांनी भाग घेतलेले आहे, मात्र मनपाला प्राप्त तीन निविदाधारक मधील बी.वी.जी.इंडीया लिमिटेड, पुणे-मुबंई रोड, चिंचवड, पुणे हि संस्था कार्यालय नगर निगम जयपुर् हैरिटेज जयपुर येथे कचरा संकलन व वाहतुक कामात चांगले काम न केल्याने काळ्या यादीत टाक़ण्यात आली आहे. त्यामुळे सध्या निविदेत तीन निविदा पैकी बी.वी.जी.इंडीया लिमिटेड, पुणे ही काळ्या यादीत असल्याने तीन पैकी दोन निविदाधारक उरतात त्यामुळे सदरची ही निविदा प्रथम वेळेस प्रसिध्द असल्याने किमान तीन निविदा प्राप्त होणे आवश्यक आहे. बी.वी.जी.इंडीया लिमिटेड,पुणे काळ्यात यादीत असल्याने त्याची आर्थिक दराचा लिफाफा उघडता येणार नसल्याने व उर्वरीत दोन निविदाधारकांमध्ये स्पर्धा
होणार नाही. त्यामुळे बी.वी.जी.इंडीया लिमिटेड, पुणे यांची निविदा ना मंजुर करुन अल्प मुदतीची नियमानुसार
फेर निविदा मागवावी अशी मागणी काका शेळके यांनी केली आहे.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version