HomeUncategorizedकालीचरण महाराजांवर नगर मध्ये गुन्हा दाखल

कालीचरण महाराजांवर नगर मध्ये गुन्हा दाखल

advertisement

अहमदनगर दि.१० मे

अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराफ यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर शहरात सकल हिंदू समाजातर्फे १४ डिसेंबर रोजी 2022 ला हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला कालिपुत्र कालीचरण महाराज आणि गुजरातमधील काजलदीदी हिंदुस्थानी उपस्थित होते. यावेळी कालीचरण महाराज यांनी मोर्चानंतर झालेल्या सभेत दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले होते. या प्रकरणे आता तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी कालीचरण महाराज यांच्या विरोधात 153 (अ) आणि 507(2) या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

कालीचरण महाराज यांच्या भाषणाला जवळपास पाच महिने होऊन गेल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी रात्री उशिरा पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय गव्हाणे यांच्या फिर्यादी वरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular