Home शहर ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावरील खोटे दाखल गुन्हे...

ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावरील खोटे दाखल गुन्हे मागे घ्यावे – राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

नगर दिनांक – २२ मे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आज अपर पोलीस अधीक्षक रप्रशांत खैरे यांना निवेदन देऊन माजी महापौर अभिषेक कळमकर आणि ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्यावर दाखल झालेले खोटे गुन्हे योग्य तपास करून मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली.

सध्या आपल्या नगर शहरा मध्ये खोटे गुन्हा दाखल करण्याची मालिका सुरू आहे. त्यातच विरोधी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. माजी आमदार दादाभाऊ कळमकर आणि माजी महापौर अभिषेक कळमकर त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हा दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न काही लोक शहरात करत आहे. फिर्यादीने नाव बदनाम करण्याच्या हेतूने कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला न्याय व्यवस्था वर पूर्ण विश्वास आहे व आपल्याकडून न्याय नक्कीच मिळणार याची आम्हाला खात्री आहे. तरी आपण या विषयावर जातीने लक्ष घालून या घटनाची सखोल चौकशी व तपास लवकरात लवकर लावावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे नामदेव पवार नलिनी गायकवाड, आल्तमेष जरीवाला,रियाज कुरेशी, सय्यद सद्दाम, शेख परवेज, प्रमोद आढाव , फैजान तांबोळी,अलका योगेश कोरेकर, सचिन नवगिरे ,संगीता खिलारी, उमेश भांबरकर, अशोक बाबर यांच्यासह, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version